एक्स्प्लोर

Asian Games : इराणच्या 'सोनेरी' यशामागचा मराठमोळा चेहरा

इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये महिला कबड्डीत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरलेल्या इराण संघाच्या कामगिरीत नाशिकच्या एका मराठमोळ्या प्रशिक्षिकेचा मोलाचा वाटा आहे. कोण आहेत त्या मराठमोळ्या प्रशिक्षिका?

Asian Games 2018 : इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये महिला कबड्डीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला इराणचा संघ आणि महाराष्ट्र यांचं खास नातं आहे. हे नातं आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. मग ऐका, हे नातं आहे गुरुशिष्यांचं. होय, इराणच्या एशियाड सुवर्णपदकविजेत्या संघाची बांधणी ही एका मराठमोळ्या प्रशिक्षिकेनं केली आहे. आणि एशियाडच्या मोहिमेत मुख्य प्रशिक्षिका या नात्याने त्या इराण संघासोबतच आहेत. इराणच्या या महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षिकेचं नाव आहे शैलजा जैन. गेली दीड वर्षे त्या मुख्य प्रशिक्षिका या नात्याने इराणच्या मुलींना कबड्डीचं मार्गदर्शन करत आहेत. शैलजा जैन यांना त्यांच्या शिष्यांनी आज एशियाड सुवर्णपदकाची गुरुदक्षिण दिली. शैलजा जैन यांचं लग्नाआधीचं नाव शैलजा धोपाडे. त्या मूळच्या विदर्भातल्या असून, त्यांनी राष्ट्रीय कबड्डीत विदर्भाचंच प्रतिनिधित्व केलं आहे. शैलजा या लग्नानंतर नाशिकमध्ये स्थायिक झाल्या, पण त्यांनी नव्या शहरातही कबड्डीची नाळ तुटू दिली नाही. नाशिकमधल्या रचना क्लबच्या त्या प्रशिक्षिका आहेत. भक्ती कुलकर्णी आणि निर्मला भोई यांच्यासारख्या अनेक उत्तमोत्तम कबड्डीपटू त्यांनी घडवल्या आहेत. शैलजा जैन यांनी खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर, एनआयएसमधून प्रशिक्षणाचा एक वर्षाचा कोर्स केला. त्यानंतर त्या कबड्डी प्रशिक्षिका म्हणून राज्य शासनाच्या सेवेत रुजू झाल्या. शैलजा जैन यांना कबड्डी प्रशिक्षणात इतका रस आहे की, त्यांनी 2004 साली मिळालेली बढतीची पहिली संधी नाकारली. त्यात खूप त्यांचं आर्थिक नुकसान झालं. शैलजा यांनी अखेर 2014 साली बढती स्वीकारली, पण शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना तुलनेत कमी निवृत्तीवेतन मिळतं. कारण त्यांनी तब्बल दहा वर्षे उशिराने बढती स्वीकारली. शैलजा जैन या दोन-तीन वर्षांपूर्वीच राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. पण निवृत्त झाल्यानंतरही त्या स्वस्थ बसलेल्या नाहीत. कबड्डी प्रशिक्षक म्हणून त्या कार्यरतच राहिल्या. कबड्डी प्रशिक्षणात असलेल्या त्या गोडीने शैलजा जैन यांना इराणच्या महिला संघाला मार्गदर्शन करण्याची संधी मिळवून दिली. शैलजा जैन यांच्या मार्गदर्शनानं इराणच्या मुलींना आजा एशियाड कबड्डीचं सोनं जिंकून दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget