Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उलटफेर, गतवर्षीच्या विजेत्या पृथ्वीराज पाटीलला पुण्याच्या हर्षद कोकाटेनं आस्मान दाखवलं
Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज एक धक्कादायक निकाल लागला. मागील वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याचा पुण्याच्या हर्षद कोकाटेनं पराभव केल्याचं पाहायला मिळालं आहे.
![Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उलटफेर, गतवर्षीच्या विजेत्या पृथ्वीराज पाटीलला पुण्याच्या हर्षद कोकाटेनं आस्मान दाखवलं Maharashtra Kesari wrestling tournament 2023 Last time winner pruthviraj patil defeated by Punes Harshad Kokate Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उलटफेर, गतवर्षीच्या विजेत्या पृथ्वीराज पाटीलला पुण्याच्या हर्षद कोकाटेनं आस्मान दाखवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/13/3fdbc33c56d2859f8803f22e610c4ce51673608229253323_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
-Maharashtra Kesari Pune News : 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पुण्यात (Pune News) सुरुवात झाली आहे. अगदी रंगतदार सामने पाहायला मिळत असून आज एक उलटफेर पाहायला मिळाला. मागील वर्षीचा महाराष्ट्र केसरी असणाऱ्या कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याचा (Pruthviraj Patil) पुण्याच्या हर्षद कोकाटेनं (Harshad Kokate)) पराभव केल्याचं पाहायला मिळालं आहे. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराजचा हर्षदनं 9-3 अशा फरकानं धुव्वा उडवला.
मागील वर्षी पृथ्वीराज पाटील यांना अत्यंत दमदार खेळ करत विजयश्री मिळवली होती. त्यामुळे यंदाही तो कमाल करतो का? हे पाहण्यासाठी सर्वांचं लक्ष्य त्याच्या कुस्तीकडे लागून होतं. अशात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या पृथ्वीराज पाटील विरुद्ध हर्षद कोकाटे लढतीत आधीपासूनच हर्षद पृथ्वीराजवर भारी पडला. पण पृथ्वीराज पाटीलनंही कडवी झुंज देत आक्रमक खेळी केली. मध्यंतरापूर्वी तीन गुण त्यानेही मिळवले. ज्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये 4-3 असा स्कोर होता आणि हर्षदने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या राऊंडमध्ये हर्षद कोकाटेने आणखी दमदार खेळ दाखवत तीन गुण खिशात घातले. पृथ्वीराज पाटीलनेही पुन्हा झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण हर्षद कोकाटेने भक्कमपणे उभा राहत पृथ्वीराजला गुण मिळवण्याची संधी दिली नाही. ज्यानंतर अखेरीस 9-3 अशा दमदार आघाडीच्या जोरावर हर्षद कोकाटेनं विजय मिळवच मैदान मारलं.
पुण्यात उत्साहात सुरु आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा
पुण्यात दिमाखात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. महाराष्ट्र पोलीस बँडने यावेळी मानवंदना दिली. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 45 संघ आणि 900 हून अधिक पैलवान या स्पर्धेत उतरणार आहे. यासाठी कुस्ती शौकिनांनी केलेली गर्दी करतील. या स्पर्धेची सुरुवात 1961साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे.
मागील 5 वेळचे महाराष्ट्र केसरी
- वर्ष 2016 - पैलवान विजय चौधरी
- वर्ष 2017 - पैलवान अभिजीत कटके
- वर्ष 2018 - पैलवान बाला रफीक शेख
- वर्ष 2019 - पैलवान हर्षद सदगीर
- वर्ष 2021-22 पैलवान पृथ्वीराज पाटील
हे देखील वाचा-
Maharashtra Kesari Pune: महाराष्ट्र केसरीचा थरार! 'हे' आहेत आतापर्यंतचे विजेते 'गदा'धारी मल्ल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)