maharashtra kesari 2025: शिवराज राक्षेवर लाथ मारण्याची वेळ का आली? आमदार रोहित पवारांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर प्रश्नांची सरबत्ती
Rohit Pawar on maharashtra kesari 2025 : आमदार रोहित पवार यांनी देखील पंचांच्या निर्णयावर टीका करत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला धारेवर धरलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत.

Maharastra Kesari 2025 : राज्यभरात सध्या फक्त महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाची चर्चा दिसून येत आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम विजेता पृथ्वीराज मोहळ ठरला. शेवटच्या फेरीत कुस्तीसाठी महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षेला (Shivraj Rakshe)भोवलं आहे. शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने (Maharashtra State Wrestling Association) घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. तर पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी (Maharastra Kesari 2025 Winner) ठरला आहे. पण शिवराज राक्षे याला वादग्रस्त पद्धतीने बाद जाहीर केल्याने मोठा वाद उद्भवला आहे. शिवराज राक्षे (Shivraj rakshe) चितपट झाला नव्हता, असं त्याच्यासह अनेकांचं म्हणणं आहे. अशातच आता आमदार रोहित पवार यांनी देखील पंचांच्या निर्णयावर टीका करत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला धारेवर धरलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती पोस्ट शेअर करत काही सवाल उपस्थित केले आहेत. 'प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्धाचा सन्मान करणारा असतो. अशा परिस्थितीत पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही, परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येतो? याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का, हेही बघितलं पाहिजे. मल्ल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यासह सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करणं हे अन्यायकारक आहे. त्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या कारवाईचा पुनर्विचार करावाच शिवाय पुन्हा असा प्रकार होऊ नये, याबाबत परिषदेने आत्मपरिक्षण करण्याचीही गरज आहे', असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
मल्लावर लाथ मारण्याची वेळ का आली?
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी सवाल उपस्थित करत, 'प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्धाचा सन्मान करणारा असतो. अशा परिस्थितीत पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही, परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येतो? याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का, हेही बघितलं पाहिजेट, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
निलंबन करण्याचा निर्णय अन्यायकारक
त्याचबरोबर रोहित पवार यांनी निलंबन करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचं सांगत, मल्ल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यासह सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करणं हे अन्यायकारक आहे. त्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या कारवाईचा पुनर्विचार करावाच शिवाय पुन्हा असा प्रकार होऊ नये, याबाबत परिषदेने आत्मपरिक्षण करण्याचीही गरज असल्याचा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्धाचा सन्मान करणारा असतो. अशा परिस्थितीत पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही, परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येतो? याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का, हेही बघितलं पाहिजे.…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 3, 2025























