एक्स्प्लोर
...म्हणून पाकिस्तानविरोधात शमीला खेळवलं नाही : विराट कोहली
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील टीम इंडियाचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरोधात झाला. पाकचा धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडिया आता श्रीलंकेला भिडण्यासाठी तयार झाली आहे. श्रीलंकेविरोधात लढण्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यात त्याने अनेक गोष्टींचा उल्लेख केला. ज्यामध्ये पाकिस्तानविरोधात मोहम्मद शमीला न खेळवण्यामागचं कारणही सांगितलं.
कोहली म्हणाला, “शमी गेल्या अनेक महिन्यांपासून 50 ओव्हरचे सामने खेळला नाही. सराव सामन्यांमधील शमीची कामगिरी पाहून मला आनंद झाला आहे. मात्र, बुमराह आणि भुवनेश्वरने गेल्या काही मालिकांमध्ये चांगला सराव आणि कामगिरी केली आहे.”
“शमीची क्षमता मला माहित आहे. त्यामुळे तो नेहमीच आमच्या ताफ्यात असेल. शमी असा खेळाडू आहे, जो कोणत्याही स्थिती सामना जिंकवून देऊ शकतो.”, असेही कोहली यावेळी म्हणाला.
2015 च्या विश्वचषकानंतर मोहम्मद शमीने एकही वनडे क्रिकेट सामना खेळला नाही आणि वारंवार होणाऱ्या दुखापतींनीही त्याला हैराण केले. गेल्या दोन वर्षांपासून दुखापतीने त्याची पाठ सोडली नाही.
कोहलीच्या वक्तव्यावरुन असं दिसून येतं की, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना श्रीलंकेविरोधात खेळण्यासाठी संधी मिळू शकते आणि मोहम्मद शमीला पुन्हा एकदा विश्रांती घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement