एक्स्प्लोर
करिअरच्या वाईट काळात द्रविडने मदत केली : पीटरसन
मुंबई : इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी कर्णधार केविन पीटरसनने टीम इंडियाचे माजी खेळाडू 'द वॉल' राहुल द्रविड यांची तोंडभरुन कौतुक केलं आहे. शिवाय त्यांचे आभारही मानले आहेत.
द्रविडने करिअरच्या वाईट काळात माझ्या खेळातील त्रुटी दूर करण्यासाठी मोठी मदत केली, असं म्हणत पीटरसनने द्रविड आणि आयपीएलचे आभार मानले.
पीटरसनने साल 2009 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.
पीटरसनने आपल्या पहिल्याच आयपीएलमध्ये तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडची जागा घेतली. त्यानंतर पीटरसनचा आयपीएलमधील प्रवास अनेक संघांमध्ये झाला.
पीटरसनने डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या संघाचं प्रतिनिधित्व केलं. तो आयपीएलमध्ये सध्या समालोचकाच्या भूमिकेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement