एक्स्प्लोर

श्रीसंत पुन्हा कधीही क्रिकेट खेळू शकणार नाही!

कोर्ट बीसीसीआयने घातलेल्या आजीवन बंदीच्या निर्णयाची न्यायिक समीक्षा करु शकत नाही, असं म्हणत श्रीसंतवरील बंदी कोर्टाने कायम ठेवली.

तिरुवअनंतपुरम : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीसंतवरील आजीवन बंदी केरळ हायकोर्टाने कायम ठेवली आहे. बीसीसीआयने केलेल्या याचिकेवर केरळ हायकोर्टाने हा निर्णय दिला. श्रीसंतवर आजीवन बंदी त्याच्याविरोधात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर घालण्यात आली आहे. त्यामुळे कोर्ट बीसीसीआयने घातलेल्या आजीवन बंदीच्या निर्णयाची न्यायिक समीक्षा करु शकत नाही, असं म्हणत श्रीसंतवरील बंदी कोर्टाने कायम ठेवली. श्रीसंतकडे आता काय पर्याय? कोर्टाच्या या निर्णयामुळे, श्रीसंतला रणजी ट्रॉफीतील आगामी सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. शिवाय बीसीसीआय आणि राज्य संघांच्या कोणत्याही सराव सत्रात त्याला सहभाग घेता येणार नाही. श्रीसंतकडे आता केवळ सुप्रीम कोर्टाचा पर्याय उरला असून तो सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे. काय आहे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण? 2013 साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळल्यानंतर श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणी त्याला दिल्लीतील तिहार जेलमध्येही ठेवण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 17 मे रोजी श्रीसंत, अजित चांडीला आणि अंकित चव्हाण यांना अटक केली होती. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या समितीने श्रीसंत दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. 13 सप्टेंबर 2013 रोजी श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. कोर्टाचा निर्णय अत्यंत वाईट : श्रीसंत कोर्टाचा निर्णय हा आतापर्यंतचा सर्वात वाईट निर्णय असल्याचं श्रीसंतने म्हटलं आहे. इतरांना वेगळा आणि आपल्याला वेगळा न्याय का, असा सवालही श्रीसंतने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget