Kavya Maran : काव्या मारनने झटक्यात खर्च केले 1 हजार कोटी! हैदराबादच्या मालकीणीने थाटात खरेदी केला आणखी एक संघ!
Kavya Maran : काव्या मारनने झटक्यात खर्च केले 1 हजार कोटी! हैदराबादच्या मालकीणीने थाटात खरेदी केला आणखी एक संघ!

Kavya Maran bought big team like IPL : आयपीएलमधील सनरायजर्स हैद्राबादच्या संघाने इंग्लंडमधील प्रसिद्ध लीग 'हंड्रेड'वर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केलीये. सनरायजर्स हैद्राबादने 'नॉर्दर्न सुपर चार्जर्स' या संघाला खरेदी केलंय. या संघाची किंमत 1 हजार 93 कोटी रुपये इतकी आहे. सनरायजर्स हैद्राबाद या संघाचे मालक कलानिधी मारन आहेत. तर सीईओ काव्या मारन आहे.
A season to be proud of 🧡#KKRvSRH #IPLonJioCinema #IPLFinalonJioCinema pic.twitter.com/rmgo2nU2JM
— JioCinema (@JioCinema) May 26, 2024
सनरायजर्स हैद्राबादने 'नॉर्दर्न सुपर चार्जर्स'चा संघ मिळवण्यासाठी मोठं यश मिळवलंय. दरम्यान, काव्या मारनने खरेदी केलेल्या संघाबाबत आणखी शेवटचा शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. कारण 'नॉर्दर्न सुपर चार्जर्स' हा संघ टीम यॉर्कशायर द्वारे संचलित केला जातोय.
'नॉर्दर्न सुपर चार्जर्स' ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून विकण्यात आलेली सहावी फ्रेंचाईजी आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स नंतर 100 बॉलच्या क्रिकेट स्पर्धेत संघ मिळवणारा सनरायजर्स हैद्राबाद हा तिसरा संघ आहे.
मागील काही दिवसांपासून इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने लंडन स्पिरिट, वेल्श फायर, मँचेस्टर ओरिजनल, बर्मिंघम फिनिक्स या संघांची विक्री केली आहे. ट्रेंट रॉकेट्स आणि सदर्न ब्रेव हे संघ देखील विक्रीसाठी तयार असल्याचे बोलले जात आहे.
चेन्नई स्थित सन ग्रुप द्वारे व्यवस्थापन केला जाणारा सरनरायजर्स हे क्रिकेट क्षेत्रातील जुने नाव आहे. ही इंडियन प्रिमिअर लीगमध्ये खेळणारी हैद्राबाद स्थित टीम आहे. सन ग्रुपची SA 20 मध्ये देखील एक टीम आहे. त्या टीमचं नाव सनरायजर्स ईस्टर्न केप असं आहे. सनरायजर्स सातत्याने सुपरचार्जसला खरेदी करण्यासाठी वाट पाहात होते.
सध्या सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिंस आहे. आयपीएलच्या मागील सिझनमध्ये ते उपविजेते ठरले होते. तर SA 20 मध्ये ते दोनदा चॅम्पियन बनले आहेत.
A season to be proud of 🧡#KKRvSRH #IPLonJioCinema #IPLFinalonJioCinema pic.twitter.com/rmgo2nU2JM
— JioCinema (@JioCinema) May 26, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
