(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jay Shah on Rohit Sharma : जय शाहांनी रोहित शर्माच्या प्रश्नावर थेट उत्तर दिलं, पण चाहत्यांच्या मनातील घालमेल आणखी वाढली!
Jay Shah on Rohit Sharma : रोहित शर्मा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा अधिकृत कर्णधार आहे, पण गेल्या एका वर्षात त्याने भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही.
Jay Shah on Rohit Sharma : T20 विश्वचषक 2024 ला अजून जास्त वेळ उरलेला नाही. आगामी T20 विश्वचषक जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघानेही टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. भारताने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-20 सामने खेळले. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच भूमीवर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.T-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार याबाबत सस्पेंस कायम आहे. रोहित शर्मा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा अधिकृत कर्णधार असेल, पण गेल्या एका वर्षात त्याने भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. रोहितचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना गेल्यावर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध होता.
जय शाह यांचं कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य
पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव शाह यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी अद्याप पुरेसा वेळ असल्याचे जय शाह यांनी सांगितले.
Jay Shah confirmed no assurance can be given to Rohit Sharma on his place in the T20WC. (Cricbuzz) pic.twitter.com/5sDh5x6E3l
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 9, 2023
जय शाह यांनी शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना 'आता यावर खुलासा करण्याची गरज काय? जूनमध्ये टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. त्याआधी आमची आयपीएल आणि अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका आहे. बीसीसीआयच्या स्वत:च्या जमिनीवर बांधले जाणारे नवे एनसीए पुढील वर्षी ऑगस्टपासून कामाला सुरुवात करेल, असेही शाह यांनी सांगितले.
बीसीसीआय सचिव द्रविडबाबत काय म्हणाले?
दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतरच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्याच्या संघाच्या कार्यकाळाचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे जय शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'आम्ही त्यांचा कार्यकाळ वाढवला आहे पण अद्याप करार निश्चित केलेला नाही. आमच्याकडे अजिबात वेळ नव्हता. माझी द्रविड आणि सपोर्ट स्टाफसोबत बैठक झाली आणि आम्ही परस्पर संमतीने कार्यकाळ वाढवण्यास सहमती दर्शवली. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर आम्ही पुन्हा भेटू आणि याबाबत निर्णय घेऊ. गेल्या T-20 विश्वचषकापासून हार्दिक पांड्याने बहुतांश सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. T20 विश्वचषक 2022 पासून भारतीय संघ एकूण 23 सामने खेळला आहे. या काळात निवडकर्त्यांनी 3 वेळा कर्णधार बदलला. T20 विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले, आयर्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत ऋतुराज गायकवाड कर्णधार होता, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आलं आहे.
कोहली-आश्विनने वर्षभर एकही सामना खेळला नाही
आश्विन 37 वर्षांचा आहे. भारतीय वनडे कर्णधार रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. विराट कोहलीही 35 वर्षांचा झाला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या तिघांनीही आपला शेवटचा टी-20 सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. जो T20 वर्ल्ड कप 2022 चा सेमीफायनल सामना होता.
रोहितनं वर्ल्डकपमध्ये क्लास दाखवला
रोहित शर्माने या वर्षात, विशेषत: एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. नुकत्याच झालेल्या क्रिकेट विश्वचषकात त्याने 125.94 च्या स्ट्राईक रेटने 597 धावा केल्या. अशा स्थितीत टी-20 विश्वचषकासाठी त्याची बोलीही जोरदार दिसते. हार्दिकचा फिटनेस हा चिंतेचा विषय असल्याने रोहित केवळ सलामीवीरच नव्हे तर कर्णधार म्हणूनही टी-20 संघात पुनरागमन करू शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या