James Anderson Viral Catch video : हवेत झेपावत 41 वर्षीय जेम्स अँडरसनने घेतलेल्या 'यशस्वी' कॅचने अंगावर शहारे येतील!
41 वर्षीय जेम्स अँडरसनने ज्याप्रकारे यशस्वी जैस्वालचा आश्चर्यकारक झेल घेतला, त्यावर फलंदाजासह चाहत्यांना विश्वास बसेनासा झाला आहे. ट्विटरवर अनेक यूझर्सकडून त्याने पकडलेल्या कॅचचे कौतुक होत आहे.
James Anderson Viral Catch : रांची कसोटीत भारतीय संघासमोर 192 धावांचे लक्ष्य आहे. टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वाल 44 चेंडूत 37 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
41-year-old James Anderson for you 🫡 pic.twitter.com/mEVmtfPwBx
— Sport360° (@Sport360) February 26, 2024
जो रूटच्या चेंडूवर जेम्स अँडरसनने यशस्वी जैस्वालचा अप्रतिम झेल घेतला. 41 वर्षीय जेम्स अँडरसनने ज्याप्रकारे यशस्वी जैस्वालचा आश्चर्यकारक झेल घेतला, त्यावर फलंदाजासह चाहत्यांना विश्वास बसेनासा झाला आहे. ट्विटरवर अनेक यूझर्सकडून अँडरसनच्या चपळाईचे आणि त्याने पकडलेल्या कॅचचे कौतुक होत आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने अँडरसनला मारलेला जबरदस्त सिक्स सुद्धा व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Special of James Anderson. pic.twitter.com/H0Gb8j00Hq
— CricketGully (@thecricketgully) February 26, 2024
जेम्स अँडरसनचा कॅच सोशल मीडियावर व्हायरल
जेम्स अँडरसनचा हा झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेम्स अँडरसन ट्रेंड करत आहे. त्याच्या झेलवर सोशल मीडिया यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत. 41 वर्षीय जेम्स अँडरसनने एक आश्चर्यकारक झेल घेऊन सर्वांनाच चकित केले. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
He is James Anderson.
— Satya Prakash (@Satya_Prakash08) February 26, 2024
He is 42 years old .
Playing longest format of cricket still fit.
Inspiration and example for so many young players . pic.twitter.com/kvIPpGVB5g
यशस्वी जैस्वालनंतर रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला
रांची कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, वृत्त लिहिपर्यंत भारताची धावसंख्या 3 बाद 118 धावा आहे. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा आणि रजत पाटीदार पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.
WHAT A CATCH BY JAMES ANDERSON.
— CricketMAN2 (@ImTanujSingh) February 26, 2024
- He is 41 years old, Unbelievable commitment by Jimmy. 🙌 pic.twitter.com/VRPvmPxoku
सध्या शुभमन गिल आणि रवीद्र जडेजा क्रीजवर आहेत. तत्पूर्वी, टॉम हार्टलीच्या चेंडूवर 55 धावा करून रोहित शर्मा बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल 37 धावा करून जो रूटचा बळी ठरली. आतापर्यंत जो रूट आणि टॉम हार्टले यांनी इंग्लंडला 1-1 असे यश मिळवून दिले आहे.
WHAT A CATCH BY JAMES ANDERSON.
— CricketMAN2 (@ImTanujSingh) February 26, 2024
- He is 41 years old, Unbelievable commitment by Jimmy. 🙌 pic.twitter.com/VRPvmPxoku
इतर महत्वाच्या बातम्या