एक्स्प्लोर
विश्वचषकाच्या फायनलमधील पराभव पचवणं कठीण : ट्रेण्ट बोल्ट
इंग्लंडच्या डावातल्या 49व्या षटकात बेन स्टोक्सचा झेल पकडून आपण सीमारेषा ओलांडण्याची केलेली चूक अजूनही भुतासारखी मानगुटीवर बसली असल्याचं बोल्टनं कबूल केलं आहे.
लंडन : क्रिकेटच्या इतिहासात विश्वचषकातील एवढा रंगतदार सामना यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. बेन स्टोक्स आणि इंग्लंडचं नशीब चांगलं होतं, त्यामुळे संघाला अखेरच्या षटकात अतिशय मौल्यवान चार अतिरिक्त धावा मिळाल्या. यामुळे लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर न्यूझीलंडचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं.
विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडकडून झालेला पराभव पचवणं कठीण असल्याचं मत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेण्ट बोल्टनं व्यक्त केलं आहे. या पराभवाची सल आणखी काही वर्षे कायम राहिल, पण सध्या कुत्र्यासमवेत समुद्रकिनाऱ्याची सैर करुन ते दु:ख हलकं करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यानं सांगितल आहे.
बोल्टने यंदाच्या विश्वचषकात 17 विकेट्स काढून कमालीची कामगिरी बजावली आहे. पण इंग्लंडच्या डावातल्या 49व्या षटकात बेन स्टोक्सचा झेल पकडून आपण सीमारेषा ओलांडण्याची केलेली चूक अजूनही भुतासारखी मानगुटीवर बसली असल्याचं बोल्टनं कबूल केलं आहे. त्यामुळं घरी परतल्यावर कुत्र्यासोबत खेळून दु:ख हलकं करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यानं सांगितलं.
सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा विजय
न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 16 धावांचं लक्ष्य होतं. पण न्यूझीलंडला 15 धावाच करता आल्या आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र सुपीरिअर बाऊंड्री काऊंट अर्थात सामन्यातील सर्वाधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडने सामना जिंकत, विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंडने या सामन्यात 24 तर न्यूझीलंडने 16 चौकार लगावले होते.
संबंधित बातम्या
सुपर ओव्हर आणि सुपर टायब्रेकरवरुन विम्बल्डन-आयसीसीमध्ये मजेशीर संवाद
World Cup 2019 | क्रिकेटचा जन्मदाता देश पहिल्यांदाच विश्वविजेता, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विजयी
ICC World Cup 2019 : विजयानंतर बेन स्टोक्सने न्यूझीलंडची माफी मागितली!
World Cup 2019 | इंग्लंडला ओव्हरथ्रोवर सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचा : सायमन टॉफेल
World Cup 2019 | इंग्लंडच्या विजयानंतर आयसीसीच्या बाऊंड्री काऊंट नियमावर खेळाडूंची नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement