WPL 2023 : नाणेफेक जिंकत मुंबईनं निवडली प्रथम गोलंदाजी, आरसीबीनं दिलं 126 धावाचं आव्हान
RCB vs MI : आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Mumbai Indians vs Royal Challengers Banglore) हे दोन संघ आमने-सामने आहेत.
MIW-W vs RCB-W, WPL 2023 : अगदी रंगतदार पद्धतीनं सुरु महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Mumbai Indians vs Royal Challengers Banglore) हे दोन संघ आमने-सामने आहेत. सामन्यात टॉस जिंकून मुंबई संघानं प्रथम गोलंदाजी करत आरसीबीला 125 अवघ्या धावांत रोखलं आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेण्याचा मुंबईची कर्णधार हरमनप्रीतचा निर्णय संघातील गोलंदाजांनी योग्य असल्याचं दाखवून दिलं आहे. आता सामन्याच्या दुसऱ्या डावात मुंबईचा संघ 120 चेंडूत 126 धावा करण्यासाठी मैदानात उतरत आहे.
सामन्याचा विचार केल्यास सर्वात आधी नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर अगदी पहिल्या षटकापासून मुंबई संघानं भेदक गोलंदाजी करत एक-एक विकेट घेण्यास सुरुवात केली. 1 रनवर बंगळुरुची पहिली विकेट गेली. त्यानंतर स्मृती आणि एलिस पेरीने काहीस डाव सावरल पण दोघीही अनुक्रमे 24 आणि 29 धावा करुन बाद झाल्या. रिचा घोषने खालच्या फळीत 29 धावांची झुंज दिली. हेदर नाईट आणि कनिका अहुजा यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. ज्याशिवाय इतर खेळाडू दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. दुसरीकडे मुंबईच्या संघाने अफलातून गोलंदाजी केली. यावेळी अमेला केरनं सर्वाधिक 3 तर इस्सी वोंग आणि नॅट ब्रंटनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर साईका इशाकनंही एक विकेट घेतली. त्यामुळे आतापर्यंतच्या सामन्यात अमेला केर हिनेच सर्वोत्तम गोलंदाजी केल्याचं दिसून आलं आहे.
View this post on Instagram
आजच्या सामन्यासाठी कसे आहेत दोन्ही संघ?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना, प्रीती बोस
मुंबई इंडियन्स : हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक
युपी-दिल्लीही आमने-सामने
आजच्या दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात 7.30 वाजत होणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
हे देखील वाचा-