WPL 2023: सलग 5 पराभवानंतरही RCB फायनल्स गाठणार? जाणून घ्या, प्लेऑफचं समीकरण
WPL 2023: महिला प्रीमियर लीगची अंतिम फेरी गाठण्यासाठी संघांमध्ये संघर्ष सुरू आहे. सलग 5 सामने जिंकून मुंबईने आपले स्थान जवळपास पक्के केलं आहे, मात्र 5 सामने गमावलेल्या आरसीबीच्या अडचणी वाढत आहेत.
WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा (Women's Premier League) पहिला सीझन सध्या सुरु आहे. सीझनची वाटचाल आता प्लेऑफकडे सुरु आहे. मुंबई इंडियन्सने आपली जागा आधीच प्लेऑफमध्ये बनवली आहे. गुजरात जायंट्स (GG) चा पराभव करुन, मुंबई इंडियन्स (MI) ने या मोसमातील त्यांचा सलग पाचवा विजय नोंदवला आणि यासह त्यांनी प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं केलं. आता उर्वरित संघांचं काय होणार? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) अजून एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे ते प्लेऑफमध्ये खेळणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण पाच संघ आहेत, त्यापैकी पॉईंट टेबलमधील अव्वल संघ थेट अंतिम फेरीत पोहोचणार आहे. दुसऱ्या क्रमांकावरील आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघामध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ पहिल्या संघासोबत फायनल खेळेल.
फायनल गाठण्याचं समीकरण काय?
14 मार्चपर्यंतची WPL मधील परिस्थिती पाहिल्यास मुंबई इंडियन्स 10 गुणांसह अव्वल, तर दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, हे दोन्ही संघ आता थेट फायनलमध्ये जाण्याच्या शर्यतीत आहेत. WPL मध्ये प्रत्येक संघाला 8-8 सामने खेळावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत जो संघ अव्वल असेल तो अंतिम फेरीत धडक देणार आहे.
अशातच जर आपण इतर संघांचं समीकरण पाहिलं तर यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स पॉईंट टेबलमध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या संघांकडे पॉईंट टेबलमध्ये दुसरं स्थान मिळवण्याची संधी आहे. पण पाचपैकी पाच पराभव पत्करलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबाबत मात्र संभ्रम आहे. आरसीबीच्या अडचणी वाढलेल्या आहेत.
संघ | सामने | जिंकलेले सामने | हरलेले सामने | नेट रनरेट | पॉईंट |
मुंबई इंडियन्स (MI) | 5 | 5 | 0 | +3.325 | 10 |
दिल्ली कॅपिटल (DC) | 5 | 4 | 1 | +1.887 | 08 |
यूपी वॉरियर्स (UP-W) | 4 | 2 | 2 | +0.015 | 04 |
गुजरात जायंट्स (GG) | 5 | 1 | 4 | -3.207 | 02 |
रॉयल चॅलेंजर बंगळुरू (RCB) | 5 | 0 | 5 | -2.109 | 00 |
आरसीबी प्लेऑफ सामन्यांसाठी पात्र ठरणार?
RCB चे अजून तीन सामने बाकी आहेत, जर त्यांनी पुढचे तिनही सामने जिंकले तर त्यांचे एकूण 6 गुण होतील. मात्र तरीही त्यांचं भविष्य इतर संघांच्या खेळीवरच अवलंबून राहावं लागणार आहे. मुंबई आणि दिल्ली संघांनी त्यांचे उर्वरित सामने जिंकल्यास आरसीबीला फायदा होऊ शकतो. कारण अशा स्थितीत गुजरात-यूपीचा पराभव होईल आणि आरसीबीला पुढे जाण्याची संधी मिळेल.
जर आरसीबीने शेवटचे तीन सामने जिंकले तर... 8 सामने, 3 विजय, 5 पराभव, असे RCB चे एकूण 6 गुण होतील.
गुजरातने यूपीसोबतचा सामना जिंकावा अशी प्रार्थनाच आरसीबी करणार आहे. जर असं झालंच तर आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. पण तरीही आरसीबीचा सुरुवातीच्या पाचही सामन्यांत पराभव झाल्यामुळे आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.
कधी कोणता सामना खेळवला जाणार?
एलिमिनेटर : 24 मार्च, शुक्रवार.
फायनल : 26 मार्च, रविवार.
महत्त्वाच्या इतर बातम्या :