आरसीबीचा सलग तिसरा पराभव, गुजरातने 11 धावांनी सामना जिंकला
RCB-W vs GG-W : अटीतटीच्या लढतीत गुजरातने आरसीबीचा 11 धावांनी पराभव केला.
RCB-W vs GG-W, Match Highlights : अटीतटीच्या लढतीत गुजरातने आरसीबीचा 11 धावांनी पराभव केला. गुजरातचा हा पहिला विजय ठरला तर आरसीबीचा हा सलग तिसरा पराभव होय. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 201 धावांचा डोंगर उभरला होता. प्रत्युत्तरदाखल आरसीबीचा संघ सहा बाद 190 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीकडून सोफी डिवायन हिने विस्फोटक खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
गुजरातने दिलेल्या 202 धावंच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला चांगली सुरुवात मिळाली होती. स्मृती मंधाना आणि सोफी डिवायन यांनी 5.2 षटकात 54 धावांचा पाऊस पाडला होता. स्मृती 18 धावा काढून बाद झाली. त्यानंतर एलिसा पेरी आणि सोफी डिवायन यांनी डाव सावरला. पण मोक्याच्या क्षणी एलिसा पेरी बाद झाली. पेरीनं 32 धावांचं योगदान दिले. एका बाजूला विकेट पडत असताना सोफीने दुसरी बाजू लावून धरली होती. सोफी डिवायन हिने 45 चंडूत 66 धावांची खेळी केली. त्याशइवाय हेथर नाईट हिने 11 चेंडूत 30 धावांची खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. ठरावीक अंतरावर विकेट्स पडल्यामुळे आरीसीबीला 202 धावांचा पल्ला पार करता आला नाही. गुजरातकडून अश्ले गार्डनेर हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
दरम्यान, महिला आयपीएलमध्ये आज गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातची सलामी फलंदाज सोफिया डंकले हिने विस्फोटक फलंदाजी केली. तिने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं. हे वुमन्स आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक होय. सोफिया डंकले हिच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकात 202 धावांचा डोंगर उभारला.
232 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या -
सोफियाने प्रथम फलंदाजी करताना 28 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावांचा पाऊस पाडला. सोफियाने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. सोफियाने या डावात 232 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. याआधीच्या दोन सामन्यात सोफियाची बॅट शांत होती. पण आज आरसीबीविरोधात सोफियाने धावांचा पाऊस पाडला.
सोफिया डंकले आणि हरलीन देओल यांची विस्फोटक फलंदाजी
सोफिया डंकले शिवाय हरलीन देओल हिनेही दमदार प्रदर्शन केले. हरलीन देओलने 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान हरलीन देओल हिने 9 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याशिवाय एश्ले गार्डेनर, दयालन हेमलता आणि सभ्भीनेनी मेघना यांनी अनुक्रमे 19, 16 आणि 8 धावांचं योगदान दिले. आरसीबीसाठी हीथर नाइट ने 2 विकेट घेतल्या. तर मेगान स्कुत आणि श्रेयंका पाटिल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.