WPL 2023 Final : नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा निर्णय
MI-W vs DC-W, Match : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सम मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर फायनलचा सामना रंगत असून जिंकणारा WPL चा पहिला विजेता ठरणार आहे.
![WPL 2023 Final : नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा निर्णय WPL 2023 DC vs MI delhi capitals Won won toss and elected to bowl first WPL 2023 Final : नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/26/f16580ecb68f0adf8d9ff034f5ee3b941679836123988345_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MI-W vs DC-W Match prediction : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धत फायनलचा सामना सुरु झाला असून दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आहे. स्पर्धेचा हा अंतिम सामना आज (26 मार्च) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता बेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे सुरू होईल. दरम्यान डब्ल्यूपीएलचे हे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वोत्परी प्रयत्न करणार हे नक्की आहे.
स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध 2-2 सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स देखील दोनदा आमनेसामने आले आहेत. साखळीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघ जवळपास सारखेच दिसले. मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 8 गडी राखून विजय मिळवला. त्याचवेळी दुसऱ्या चकमकीत दिल्ली कॅपिटल्सने 9 गडी राखून विजय मिळवला. साखळी सामन्यांतील दोघांचे सामने पाहून कोणालाही विजेता म्हणणे सोपे नाही. अशा स्थितीत अंतिम सामन्यात कमालीची उत्सुकता पाहायला मिळणार हे नक्की.
साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी उत्कृष्ट
स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये दोन्ही संघांकडून उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. मुंबईने महिला प्रीमियर लीगची सुरुवात सलग पाच विजयांसह केली. त्याचवेळी दिल्लीने पहिले दोन सामने जिंकले होते. दोन्ही संघांना 8 लीग सामन्यांपैकी 6-6 असे जिंकण्यात यश आले. चांगल्या नेट रनरेटमुळे, दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि संघाने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला, तर मुंबईला यूपी वॉरियर्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागला.
दोन्ही संघांची प्लेइंग-11
विजेतेपदाच्या लढतीसाठी दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल खास बदल केलेले दिसत नाहीत. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने एक बदल केलेला आहे. मिनू मानी ही पूनम यादवच्या जागी संघात खेळत आहे. तर मुंबई इंडियन्स सेम प्लेईंग-11 ला घेऊन मैदानात उतरत आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य प्लेईंग इलेव्हन- मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, राधा यादव, शिखा पांडे
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)