WPL 2024: पाच संघ अन् 22 सामने; वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनला आजपासून सुरुवात, पहिल्या सामन्यात मुंबई-दिल्ली भिडणार!
WPL 2024 Details: वुमन्स प्रीमियर लीग 2024 आजपासून, 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पाच संघांच्या स्पर्धेचा हा दुसरा हंगाम असेल.
Women's Premier League 2024 Details: वुमन्स प्रीमियर लीग 2024 (Women's Premier League) आजपासून म्हणजेच, 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गेल्या मोसमातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. पाच संघांच्या स्पर्धेचा हा दुसरा हंगाम असेल. स्पर्धेतील मागील वेळेप्रमाणे, यंदाही अंतिम फेरीसह एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.
सामन्यांची वेळ काय असणार?
वुमन्स आयपीएल (WPL) स्पर्धेतील सर्व 22 सामने संध्याकाळी 7.30 पासून खेळवले जातील. 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 17 मार्च रोजी खेळवला जाणार आहे.
कुठे खेळवले जाणार सामने?
स्पर्धेचे सर्व 21 सामने दिल्ली आणि बंगळुरू येथे खेळले जातील, ज्यामध्ये अरुण जेटली स्टेडियम आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम यजमान असतील.
पाच संघांमध्ये ट्रॉफीसाठी लढत
WPL 2024 मध्ये एकूण पाच संघ सहभागी होतील, जे WPL च्या ट्रॉफीसाठी लढतील. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या पाच संघांचा समावेश असेल. सर्व संघ 8-8 लीग सामने खेळतील. पॉईंट टेबलमध्ये असलेला संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल.
CAN. NOT. WAIT 🤩
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 22, 2024
The #TATAWPL Season 2 is less than 24 hours away ⏳ pic.twitter.com/yg6vY26an1
फ्रीमध्ये कुठे पाहता येईल लाईव्ह टुर्नामेंट?
संपूर्ण डब्ल्यूपीएल 2024 स्पोर्ट्स 18 मार्फत तुम्ही टीव्हीवर लाईव्ह पाहू शकणार आहात. याव्यतिरिक्त सर्व सामन्यांचं फ्री लाईव्ह स्ट्रिमिंग जियोसिनेमा अॅप आणि वेबसाईटमार्फत केलं जाणार आहे.
WPL मधील सर्व संघांचे स्क्वॉड
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
जेमिमाह रोड्रिग्स, लौरा हॅरिस, मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, स्नेहा दीप्ति, एलिस कॅप्सी, एनाबेल सदरलँड, अरुंधति रेड्डी, जेस जोनासेन, अश्वनी कुमारी, अपर्णा मंडल, तानिया भाटिया, पूनम यादव, टिटास साधू.
गुजरात जायंट्स (Gujarat Giants)
लौरा वोल्वार्ड्ट, फोबे लिचफील्ड, प्रिया मिश्रा, तृषा पूजिता, एशले गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देयोल, वेदा कृष्णमूर्ति, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, सयाली सतघारे, तनुजा कंवर, तरन्नुम पठान, बेथ मूनी, लिया ताहुहू, मन्नत कश्यप, मेघना सिंह, शबनम शकील.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
अमनजोत कौर, अमेलिया केर, अमनदीप कौर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेले मॅथ्यूज, हुमैरा काजी, इस्सी वोंग, जिंतिमनी कलिता, कीर्तन बालाकृष्णन, नट साइवर-ब्रंट*, पूजा वस्त्राकर, सजीवन संजना, प्रियंका बाला, यास्तिका भाटिया, फातिमा जाफर, सॅका इशाक, शबनिम इस्माइल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)
दिशा कसाट, शबनीम इस्माइल, स्मृति मंधाना, आशा शोभना, एलिसे पेरी, जॉर्जिया वेयरहॅम, कनिका आहूजा, नदाने डी क्लर्क, श्रेयंका पाटिल, सोफी डिवाइन, शबनम सतीश, इंद्राणी रॉय, ऋचा घोष, रेणुका सिंह, एकता बिष्ट, केट क्रॉस, रेणुका सिंह, केट क्रॉस, सिमरन बहादुर, सोफी मोलिनेक्स.
यूपी वॉरियर्स (UP Warriorz)
किरण नवगिरे, डॅनी व्याट, श्वेता सहरावत, वृंदा दिनेश, चमारी अटापट्टू, दीप्ति शर्मा, ग्रेस हॅरिस, पारशवी चोपड़ा, पूनम खेमनार, एस यशश्री, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मैकग्राथ, एलिसा हीली, लक्ष्मी यादव, अंजलि सरवानी, राजेश्वरी गायकवाड, गौहर सुल्ताना, साइमा ठाकोर.
WPL चं संपूर्ण शेड्यूल
23 फेब्रुवारी |
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
24 फेब्रुवारी |
रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
25 फेब्रुवारी |
गुजरात जाएंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
26 फेब्रुवारी |
यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
27 फेब्रुवारी |
रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध गुजरात जाएंट्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
28 फेब्रुवारी |
मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
29 फेब्रुवारी |
रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
1 मार्च |
यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जाएंट्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
2 मार्च |
रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
3 मार्च |
गुजरात जाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
4 मार्च |
यूपी वारियर्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू |
एम चिन्नास्वामी स्टेडियम |
5 मार्च |
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स |
अरुण जेटली स्टेडियम |
6 मार्च |
गुजरात जाएंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू |
अरुण जेटली स्टेडियम |
7 मार्च |
यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स |
अरुण जेटली स्टेडियम |
8 मार्च |
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स |
अरुण जेटली स्टेडियम |
9 मार्च |
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जाएंट्स |
अरुण जेटली स्टेडियम |
10 मार्च |
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू |
अरुण जेटली स्टेडियम |
11 मार्च |
गुजरात जाएंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स |
अरुण जेटली स्टेडियम |
12 मार्च |
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू |
अरुण जेटली स्टेडियम |
13 मार्च |
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जाएंट्स |
अरुण जेटली स्टेडियम |
15 मार्च |
एलिमिनेटर |
अरुण जेटली स्टेडियम |
17 मार्च |
फायनल |
अरुण जेटली स्टेडियम |
महत्त्वाच्या इतर बातम्या :