MS Dhoni: धोनीने अचानक CSK चं नेतृत्व का सोडलं, ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद कोणी सोपवलं? दोन प्रश्नांची मोठी उत्तरं!
IPL 2024: Latest Marathi News: धोनी जो निर्णय घेईल, तो संघासाठी योग्य असेल, असं असंही सीएकेच्या व्यवस्थापनाने सांगितले होते.
IPL 2024: Latest Marathi News: आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने नेहमीप्रमाणे चाहत्यांना धक्का देत सीएसके संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. धोनीने गुरुवारी सकाळी सीएसकेच्या व्यवस्थापनाला सांगितले की, तो संघाचे कर्णधारपद सोडत आहे. तत्पूर्वी, त्याने त्याच्या इतर सहकारी आणि सहकाऱ्यांसोबत नाश्त्याच्या टेबलावर यावर चर्चा केली होती.
एमएस धोनीने सीएसकेच्या व्यवस्थापनाला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आणि कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) सोपवणार असल्याचं सांगितले. ऋतुराज गायकवाडला या भूमिकेसाठी गेल्या काही काळापासून तयारही केले जात होते. आता ऋतुराज गायकवाड कर्णधारपद सांभाळण्यासाठी तयार झाल्याने धोनीने सीएसकेचं नेतृत्व सोडलं.
ऋतुराज गायकवाडबद्दल सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, त्याला या भूमिकेसाठी दोन वर्षांपासून तयार केले जात होते. हा अचानक घेतलेला निर्णय आहे, पण सध्या संघाची स्थिती 2022 मध्ये रवींद्र जडेजा जेव्हा कर्णधार बनला त्यापेक्षा चांगली आहे. धोनी जो निर्णय घेईल, तो संघासाठी योग्य असेल, असं असंही सीएकेच्या व्यवस्थापनाने सांगितले होते.
सर्वात कमी किमतीचा कर्णधार
27 वर्षीय ऋतुराज गायकवाड 2019 मध्ये CSK मध्ये आला होता. त्यावेळी त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. तेव्हापासून आजपर्यंत त्याचा आलेख वाढतच आहे. त्याला 2022 मध्ये ऑरेंज कॅप मिळाली आणि CSK ने 6 कोटी रुपयांमध्ये राखून ठेवलेल्या काही खेळाडूंपैकी तो होता. आता ऋतुराज सर्वात कमी किमतीचा कर्णधार असेल.
ऋतुराज गायकवाड कारकीर्द-
2018 मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडला खरेदी केले होते. 2019 च्या हंगामात ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. ऋतुराज गायकवाडने जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो कर्णधार होता. 2021 च्या आयपीएल हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तसेच T20 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचा कर्णधार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण संघ (CSK Squad):
एमएस धोनी, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, तुषार देशपांडे, अजय मंडल, मुकेश चौधरी, राजवर्धन शेखर, राजवर्धन शेख, राजवर्धन शेख सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, अवनीश राव अरावली (सर्व भारतीय), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (न्यूझीलंड), मथिशा पाथिराना, महीश तिक्ष्णा (श्रीलंका) आणि मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश).