IPL 2025 Delhi Capitals : एक गेला... दुसरा तगडा खेळाडू आला! अखेरच्या क्षणी दिल्लीची मोठी खेळी, बाकीच्या संघाची वाजली धोक्याची घंटी
Jake Fraser-McGurk News IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स संघात मोठा बदल झाला आहे. आयपीएल 2025 पुन्हा सुरू होण्यापूर्वी स्टार खेळाडूला दिल्ली संघातून वगळण्यात आले आहे.

Delhi Capitals Jake Fraser-McGurk Replacement : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तानने एकमताने युद्धबंदीवर सहमती दर्शविली. आता यानंतर आयपीएल 2025 सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव वाढला, तेव्हा आयपीएल 2025 मध्येच थांबवण्यात आली होती. आता 17 मे पासून पुन्हा आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्याआधी प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचण्यापासून अवघ्या काही पावले दूर असताना दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. जेक फ्रेझर मॅकगर्कने आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्यास नकार दिला. दिल्लीसाठी आगामी सर्व सामने जिंकणे खूप महत्वाचे आहे.
एक गेला... दुसरा तगडा खेळाडू आला!
दिल्ली कॅपिटल्स संघातून वगळण्यात आल्यानंतर बांगलादेशी खेळाडूने सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कची जागा घेतली आहे. मुस्तफिजूर रहमान 2 वर्षांनी दिल्ली संघात परतत आहे. ही माहिती दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. बांगलादेशच्या या वेगवान गोलंदाजासह दिल्ली संघ आता प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करू इच्छितो.
Mustafizur Rahman is back in 💙❤️ after two years!
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 14, 2025
He replaces Jake Fraser-McGurk who is unavailable for the rest of the season. pic.twitter.com/gwJ1KHyTCH
आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स कुठे आहे?
आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 6 सामने जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. दिल्लीचा एक सामनाही अनिर्णित राहिला. दिल्ली कॅपिटल्सने या 11 सामन्यांमध्ये 13 गुण मिळवले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला दिल्ली संघ चांगली कामगिरी करत होता, परंतु गेल्या पाच सामन्यांमध्ये संघाला फक्त एकच सामना जिंकता आला आहे.
दिल्ली कॅपिटल्स अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत...
दिल्ली कॅपिटल्स अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली डीसीला अजूनही तीन सामने खेळायचे आहेत, त्यापैकी दोन सामने जिंकणे खूप महत्वाचे आहे. जर दिल्लीने या 3 पैकी 2 सामने गमावले तर संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल. दिल्लीचा 12 वा सामना 18 मे रोजी गुजरातविरुद्ध होईल. यानंतर, डीसीकडे मुंबई आणि पंजाबविरुद्धही सामने खेळायचे आहेत.
हे ही वाचा -





















