(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2025 Mega Auction : मेगा लिलावाचा 'मास्टर माइंड', ज्याने अय्यर-अर्शदीपच्या नावावर प्रीती झिंटाला गुंडाळलं
सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयपीएल 2025 चा मेगा लिलाव सुरू आहे.
Kiran Kumar Grandhi IPL 2025 Mega Auction : सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयपीएल 2025 चा मेगा लिलाव सुरू आहे. ऋषभ पंतने आयपीएलचे सर्व विक्रम मोडीत काढत 27 कोटींची मोठी रक्कम मिळवली. पंतला लखनऊ सुपर जायंट्सने विकत घेतले. त्याचवेळी पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरसाठी 26.75 कोटींची बोली लावली. दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये बसलेल्या संघाचा सहमालक किरण कुमार ग्रांधीमळे मेगा लिलावात पंजाब संघाचे मोठे नुकसान झाले. किरणने श्रेयस अय्यरला मिळवण्यासाठी पंजाब किंग्जसोबत बोली लावली आणि शेवटच्या क्षणी माघार घेतली, ज्यामुळे पंजाबला अय्यरसाठी मोठी रक्कम मोजावी लागली.
That smile, that damned smile
— Aman (@CricketSatire) November 24, 2024
GOAT DC owner is back !!
Wasted 26.75 crores of PBKS 🤣🤣🤣#IPLAuction pic.twitter.com/4bNZPL2IvR
मेगा लिलावाचे मास्टर माइंड
अर्शदीप सिंगचे नाव येताच लिलावाच्या टेबलावर दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये बसलेल्या किरण कुमार ग्रांधीचा खेळ सुरू झाला. दिल्लीने अर्शदीपसाठी बोली सुरू केली. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनीही अर्शदीपला घेण्यास रस दाखवला, परंतु नंतर दोन्ही संघांनी हार पत्करली. सनरायझर्स हैदराबादनेही अर्शदीपच्या नावावर बोली लावली. अर्शदीपच्या नावावर बोली लावताना दिल्लीने 15 कोटींचा आकडा पार केला आणि अर्शदीपच्या नावावरची बोली 18 कोटींवर पोहोचली. अर्शदीप पंजाब किंग्ज संघात पुन्हा सामील झाला असला तरी त्यांना भारतीय वेगवान गोलंदाजासाठी मोठी रक्कम मोजावी लागली.
GOAT Kiran Grandhi 🐐 pic.twitter.com/yPik6vbWbP
— Aman (@CricketSatire) November 24, 2024
अर्शदीपनंतर किरण ग्रांधीने श्रेयस अय्यरच्या नावावर पंजाब किंग्जसोबत असाच खेळ केला. किरणने श्रेयससाठी सतत बोली लावली आणि 20 कोटींची रक्कमही पार केली. कर्णधाराच्या शोधात असलेला पंजाब किंग्ज संघ दिल्लीसोबतच्या बोली सामील झाला. दिल्लीने अय्यरच्या नावावर 25 कोटी रुपयांची बोली लावली आणि नंतर हात मागे घेतला. त्यामुळेच पंजाबला अय्यरला खरेदी करण्यासाठी 26.75 कोटी रुपये मोजावे लागले. किरण ग्रांधीच्या शहाणपणामुळे आणि हुशारीमुळे मेगा लिलावात सर्वात मोठी पर्स घेऊन आलेल्या पंजाब किंग्जचे मोठे नुकसान झाले.
दिल्ली कॅपिटल्ससाठी संघ निवडताना किरण ग्रांधीने आतापर्यंत खूप शहाणपणा दाखवला आहे. दिल्लीने 14 कोटी रुपये खर्च करून मेगा लिलावात केएल राहुलचा संघात समावेश केला. यासोबतच गेल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कलाही दिल्लीने 11.75 कोटी रुपयांना संघात सामील करून घेतले. दिल्लीने ऋषभ पंतसाठी राईट टू मॅच कार्डचाही वापर केला, पण लखनऊने 27 कोटींची बोली लावल्यानंतर ते मागे पडले.
This man made an entire franchise believe that Shreyas Iyer is worth 26.75 crores 🫡#ViratKohli𓃵 #INDvAUS #AUSvsIND #IPLAuction #IPLAuction2025 #TestCricket #ViratKohli #JaspritBumrah #siraj #IPLAuction2025 #IPLAuction2025 #IPL2025 pic.twitter.com/AI0iExbmjj
— FatBatman (@iam_FatBatman) November 24, 2024