IPL 2023 : झूमे जो पठान... कोहलीने शाहरुख खानसोबत गाण्याच्या तालावर धरला ठेका, पाहा Video
Virat Kohli Shah Rukh Khan Jhume Jo Pathan Song : कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर शाहरुख खानने विराट कोहलीची भेट घेतली. यानंतर दोघेही पठाण चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसले.
Virat Kohli Dance with Shah Rukh Khan : कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RCB) रोमांचक सामन्यात विजय मिळवला. केकेआरच्या दमदार गोलंदाजांनी आरसीबीला (RCB) नांगी टाकायला भाग पाडली. कोलकाताने शानदार फलंदाजी करत आरसीबीला 204 धावांचं लक्ष्य दिलं. पण, कोलकाताच्या स्पिनर्सच्या चांगल्या फॉर्ममुळे बंगळुरुला मोठी धावसंख्या उभारत आली नाही. परिणामी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 81 धावांनी पराभव पत्करावा लागला. आयपीएल 2023 मधील कोलकाता नाईट रायडर्सचा हा पहिला विजय होता. केकेआरने मालक शाहरुख खानच्या उपस्थितीत आयपीएलमध्ये खातं उघडलं. सामना जिंकल्याचा आनंद शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता.
सामना झाल्यानंतर 'किंग खान' शाहरुखने (Shah Rukh Khan) दोन्ही संघाच्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी शाहरुख खानने विराट कोहलीचीही (Virat Kolhi) भेट घेतली. शाहरुखने 'किंग' कोहलीची भेट घेत प्रेमाने गालही ओढला. इतकंच नाही तर या भेटीनंतर दोन्ही 'किंग' शाहरुखच्या पठाण चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसले. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Virat Kohli & Shahrukh Khan dancing "Jhoome Jo Pathan".
— Johns. (@CricCrazyJohns) April 6, 2023
The best moment of the day. pic.twitter.com/SrZv0ua8xq
व्हायरल व्हिडीओमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर किंग कोहली आणि किंग खान शाहरुख खान एकत्र डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाहरुख खान विराट कोहलीला झूमे जो पठाण या गाण्यावर डान्स करायचा शिकवत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून प्रचंड व्हायरलही झाला आहे.
पाहा व्हिडीओ : कोहलीने शाहरुख खानसोबत गाण्याच्या तालावर धरला ठेका
#ViratKohli #KKRvsRCB #KKRvRCB
— 👌⭐👑 (@superking1815) April 6, 2023
Shahrukh Khan meets Virat Kohli.
Two of the best from India! and both of them shaking legs for jhoome jho pathaan pic.twitter.com/PJncZL9tUK
KKR vs RCB, Match Highlights : कोलकाताचा आरसीबीवर विराट विजय
लॉर्ड शार्दूल ठाकूर याच्या वादळी अर्धशतकानंतर फिरकीच्या तडाख्यात आरसीबीचा (RCB) संघाची दाणादाण उडाली. एकतर्फी सामन्यात कोलकात्याने आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला. कोलकात्याने (KKR) दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने 123 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीला संपूर्ण 20 षटकेही फलंदाजी करता आली नाही. कोलकात्याच्या फिरकीसमोर आरसीबीचा डाव कोसळला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
