Rinku Singh, IPL 2023 : नववी नापास, मात्र क्रिकेटमध्ये नेहमीच फुल्ल मार्क्स; शार्दुलसोबत KKR साठी धावांचा डोंगर रचणारा रिंकू सिंह नेमका कोण?
Rinku Singh in IPL 2023, KKR vs RCB : नववी फेल रिंकू सिंहने क्रिकेटमुळे कधी वडीलांचा मारही खाल्ला होता. हाच रिंकू सिंह कोलकाताच्या विजयाचा नांगर ठरला.
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) नवव्या सामन्यात (IPL 2023 Match 9) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) पराभव केला. केकेआरने आरसीबीचा पराभव करून गुणतालिकेत खातं उघडलं. 205 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ केवळ 123 धावांवर बाद झाला. गोलंदाज सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांनी आरसीबीच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. शार्दुल ठाकूरच्या झंझावाती अर्धशतकामुळे पहिल्या डावात केकेआरने 20 षटकांत सात गडी गमावून 204 धावा केल्या. कोलकाताच्या आणखी एका खेळाडूने दमदार खेळी केली आणि केकेआरच्या विजयाचा नांगर टाकण्यास मदत केली. हा खेळाडू म्हणजे रिंकू सिंह. रिंकू सिंहने 46 धावांची शानदार खेळी केली.
रिंकू सिंहची दमदार फलंदाजी
कोलकाता नाईट रायडर्सकडून रिंकू सिंहची पुन्हा एकदा शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशच्या रिंकूने सामन्यात कठीण वेळी समंजस खेळी खेळली केली. संधी मिळाल्यावर त्याने मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांसारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांनाही झोडपून काढलं.
BRB, gotta find that ball! 👀💜@rinkusingh235 #KKRvRCB | #AmiKKR | #TATAIPL 2023 pic.twitter.com/0gx2jQwogh
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2023
रिंकू आणि शार्दूलने सावरली केकेआरची फलंदाजी
केकेआर संघ त्यांच्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी उतरला. रहमानुल्लाह गुरबाजने एका टोकावर धावा जोडत होता. पण, दुसऱ्या टोकाला विकेट पडत होत्या. 12व्या षटकात 89 धावांवर आंद्रे रसेलची विकेट पडली. यानंतर केकेआर 150 धावांपर्यंतही पोहोचू शकणार नाही असं वाटत होतं. पाच विकेट गमावल्यानंतर रिंकू सिंहने शार्दूल ठाकूरसोबत मिळून कोलकाताची फलंदाजी सावरली.
रिंकू सिंहची शार्दूल ठाकूरला चांगली साथ
यानंतर शार्दूल ठाकूरने आक्रमक रुप धारण करत धावांचा पाऊस पाडला. मैदानाच्या चोहूबाजूने चौकार आणि षटकार लगावत असलेल्या शार्दूल ठाकूरला रिंकूने उत्तम साथ दिली. रिंकूने 33 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. अखेरच्या षटकात धावा चोपण्याच्या नादात रिंकू सिंह बाद झाला आणि त्याचं अर्धशतक अवघ्या चार धावांनी हुकलं
Rinku Singh meets King Kohli. pic.twitter.com/HlzqtYPodD
— Johns. (@CricCrazyJohns) April 6, 2023
रिंकू सिंह नववीत झाला नापास
रिंकू सिंहसाठी आयपीएलपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील गॅस सिलेंडर डिलिव्हरीचं काम करायचे आणि त्याचा भाऊ ऑटो रिक्षा चालवायचा. त्याला पाच भावंडे आहेत. रिंकू अभ्यासात हुशार नव्हता आणि एकदा नववी इयत्तेत नापास झाला होता.
वडील क्रिकेट खेळल्यामुळे वडीलांचा खाल्ला मार
रिंकूने सांगितलं की, क्रिकेट खेळल्यामुळे त्याने वडीलांचा मारही खाल्ला. सुरुवातीला रिंकूचे वडील त्याच्या क्रिकेट खेळण्याविरोधात होते. त्यामुळे तो त्याने क्रिकेट खेळल्यावर ते रिंकूला मारायचे. पण, जेव्हा त्याने क्रिकेट खेळू दुचाकी जिंकली तेव्हा वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्याला समर्थन दिलं. नंतर त्याच दुचाकीने त्याचे वडील सिलेंडर वितरणासाठी जाऊ लागले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :