Mumbai Indians : मुंबई इंडियन्स हातातली मॅच गमावली, विरेंद्र सेहवाग भडकला, रोहित अन् सूर्याची घेतली शाळा
Virender Sehwag : मुंबई इंडियन्सनं कचखाऊ फलंदाजीमुळं हातात आलेली मॅच गमावली. यानंतर टीम इंडियाची माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग भडकला.
कोलकाता : आयपीएल (IPL 2024)मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात काल ईडन गार्डन्सवर मॅच पार पडली. कोलकाता नाईट रायडर्सनं ही मॅच 18 धावांनी जिंकली. कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 158 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सचा संघ या धावसंख्येचा पाठलाग करताना 8 विकेटवर 139 धावांपर्यंत पोहोचला. मुंबईच्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळं त्यांचा पराभव झाला. मुंबई इंडियन्सला फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळं मॅच गमवावी लागल्यानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागनं संताप व्यक्त केला आहे. सेहवागनं रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीच्या पद्धतीवर टीका केली.
विरेंद्र सेहवाग म्हणाला की जो चांगली बॉलिंग करतो ती खेळून काढा, जर दोन विकेट पडल्या नसत्या म्हणजेच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी मॅच एक ओव्हर बाकी ठेवत संपवली असती. वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांना बॉलिंग करायची होती. जर त्यांनी फिरकीपटूंना खेळताना विकेट गमावल्या नसत्या तर त्यांनी मॅच जिंकली असती,असं सेहवागनं म्हटलं तो क्रिकबझसोबत बोलत होता.
सेहवागनं पुढं म्हटली की तुम्ही ज्यावेळी बॅटिंग करत असता त्यावेळी तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवता आलं पाहिजे. नमन धीर अखेरच्या टप्प्यात फलंदाजीला आला आणि त्यानं दोन षटकार आणि एक चौकार मारला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव दोघेरी स्थिरावले होते. त्यांना केवळ पाच चौकार मारयाचे होते. सेहवागनं रोहित शर्मावर तो ज्या प्रकारे बाद झाला यावरुन टीका केली. रोहितनं आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचं सेहवाग म्हणाला.
वरिष्ठ खेळाडूंनी आपल्या शॉट सिलेक्शनवरुन इतर खेळाडूंपुढं एक उदाहरण ठेवलं पाहिजे. सेहवाग पुढे म्हणाला की तुम्ही रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार यादव असू शकता. मात्र, तुम्ही जर बॉलर्सचा सन्मान करत नसाल तर किमान बॉलचा तरी सन्मान करा.रोहित शर्मा ज्यावर बाद झाला तो साधा बॉल नव्हता. सूर्युकमार यादव आणि रोहित शर्मा महान खेळाडू आहेत यात शंका नाही. मात्र, तुम्हाला चांगल्या बॉलवर देखील फटकेबाजी केली पाहिजे असं होऊ शकत नाही, असं सेहवागनं म्हटलं.
दरम्यान, रोहित शर्मानं चेन्नई सुपर किंग्ज विरोधात शतक झळकावल्यानंतर त्याला नंतरच्या मॅचेसमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती.
संबंधित बातम्या :
Rohit Sharma : रोहित शर्माच्या मनात नेमकं काय? व्हायरल व्हिडीओनंतर केकेआरच्या प्रशिक्षक ,खेळाडूंसोबत बैठक, वेगळं पाऊल टाकणार?