IPL 2023 : 'किंग' कोहलीचा Beast Mode On... वर्कआऊटचा व्हिडीओ पाहून चाहते दंग; तुम्हीही पाहा एक झलक
Virat Kohli Workout : आयपीएलच्या समान्या आधी विराट कोहली जीममध्ये वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ पाहून चाहतेही चकित झाले आहेत.
Virat Kohli Gym Workout : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता सामना रंगणार आहे. आज बंगळुरुच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्या आधी आरसीबीचा खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. कोहलीने त्याच्या दमदार वर्कआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोहलीचा वर्कआऊट व्हिडीओ पाहून चाहते चांगलेच दंग झाले आहेत.
जीममध्ये घाम गाळताना दिसला 'किंग' कोहली
विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या इंस्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook) आणि ट्विटर (Twitter) तिन्ही अकाऊंटवरून हा वर्कआऊटचा (Kohli Gym Workout Video) व्हिडीओ शेअर केला आहे. विराट कोहली जीममध्ये हेवी वेट उचलून गाम गाळताना करताना दिसत आहे. विराट कोहलीने आयपीएल 2023 मध्ये दमदार सुरुवात केली आहे. कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यामुळेच कोहली आगामी सामन्यासाठी कसून सराव आणि तयारी करताना दिसत आहे. आज आयपीएल 2023 च्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहली 'बिस्ट' मोडमध्ये पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : 'किंग' कोहलीचा 'बीस्ट मोड ऑन'
View this post on Instagram
एमिनेमच्या गाण्यांवर घाम गाळतोय कोहली
कोहली जीममध्ये वजन उचलून आणि एमिनेमच्या (Eminem) गाण्यांवर घाम गाळताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. 34 वर्षीय विराट कोहली यंदा दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. कोहलीने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत चार अर्धशतकं झळकावली आहेत आणि तो सध्या आयपीएल 2023 ऑरेंज कॅप यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
RCB vs RR IPL 2023 : आज बंगळुरु विरुद्ध राजस्थान
आयपीएल (IPL 2023) आज, रविवारी 23 एप्रिलला राजस्थान (Rajasthan Royals) आणि बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आज बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्तान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ सहाव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
RCB vs RR Playing 11 : बंगळुरु आणि राजस्थान आमने-सामने, कोहलीविरोधात सॅमसनचे 'हे' 11 गडी मैदानात