WPL 2023 : IPL मधील कोहलीचा पराभवाचा वारसा आता स्मृती मानधनाकडे? WPL मधील RCB च्या दुहेरी पराभवानंतर मीम्सचा पूर
RCB Twin Losses in WPL 2023 : IPL मधील कोहलीचा पराभवाचा वारसा आता स्मृती मानधनाकडे आहे की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. RCB च्या दुहेरी पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.
![WPL 2023 : IPL मधील कोहलीचा पराभवाचा वारसा आता स्मृती मानधनाकडे? WPL मधील RCB च्या दुहेरी पराभवानंतर मीम्सचा पूर Virat Kohli s legacy is now followed by Smriti Mandhana RCB twin losses in WPL 2023 trigger hilarious meme fest WPL 2023 : IPL मधील कोहलीचा पराभवाचा वारसा आता स्मृती मानधनाकडे? WPL मधील RCB च्या दुहेरी पराभवानंतर मीम्सचा पूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/07/5f0cb6211cfa3081cff2ec6d5ede9ae11678169483687322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Smriti Mandhana will Follow Virat Kohli's legacy : महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (Royal Challengers Bangalore) संघाला दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघावर 9 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. दरम्यान, RCB पुरुष संघ आणि त्याचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्या पराभवाचा वारसा आता स्मृती मानधनाकडे आहे की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. WPL मधील RCB च्या दुहेरी पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.
IPL मधील कोहलीचा पराभवाचा वारसा आता स्मृती मानधनाकडे
महिला प्रीमियर लीग (WPL 2023) 4 मार्चपासून सुरू झाली आहे. चाहते या लीगचा खूप आनंद घेत आहेत. या लीगमध्ये आतापर्यंत पाच संघ सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचाही समावेश आहे. या संघाचे नेतृत्व टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिच्या हाती आहे. आरसीबीचे कर्णधारपद मिळाल्यानंतर अनेकांनी तिची तुलना आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत केली आहे. आयपीएलमधील कोहलीचा पराभवाचा वारसा आता स्मृती मानधनाकडे आहे की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.
आरसीबी आयपीएल जिंकू शकलेला नाही
RCB हा अशा संघांपैकी एक आहे जो आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून आहे मात्र, आतापर्यंत या फ्रँचायझीला एकही IPL आयपीएल जिंकता आलेली नाही. मात्र, आता महिला प्रीमियर लीगमध्ये या संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता RCB महिला संघ WPL मध्ये विजय मिळवण्यात यशस्वी होतो की नाही, हे पाहावं लागेल.
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
Virat Kohli ki legacy ko Smriti mandhana barkrar rakhti Hui
— 200 marega aaj 🔥राजपूत (@Rajawat636714) March 5, 2023
😂😂
Every time chokar franchise RCB@RCBTweets @imVkohli @mandhana_smriti pic.twitter.com/x3Ak1iTr97
Tough to be an RCB Fan....😥#RCBvMI #WPL2023 #MIvsRCB pic.twitter.com/0m2qkEObc3
— Cricpedia (@_Cricpedia) March 6, 2023
Wise words #RCBvMI#RCB #wplpic.twitter.com/XXKVQ19E6h
— peace maga... (@peace_maga_) March 6, 2023
Every Year Same Story For RCB Fans And Meme Material For MI And CsK Fans pic.twitter.com/sgKFfQOqPt
— Captain Jack Sparrow (@ImVivaan45) March 6, 2023
RCB men & RCB women pic.twitter.com/9PEJ0vbrsc
— Alexandra Hartley (@AlexHartley93) March 5, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या :
WPL: 86 बॉल्स, 159 रन्स.... मुंबई इंडियन्ससमोर RCB चीतपट, सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)