Virat Kohli IPL 2024 Record: विराट कोहलीने इतिहास रचला; आयपीएलमध्ये मोठा टप्पा गाठला
Virat Kohli IPL 2024 Record: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात कोहलीने 29 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली.
Virat Kohli IPL 2024 Record: विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम केला आहे. आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 68व्या लीग सामन्यात कोहलीने या विशेष विक्रमावर आपले नाव नोंदवले. विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात 700 चौकारांचा टप्पा पार करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा आकडा शिखर धवनने पार केला होता.
आता धवनच्या त्या यादीत कोहलीचाही समावेश झाला आहे. धवनने आयपीएलच्या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 768 चौकार मारले आहेत. आता कोहली 700 हून अधिक चौकार मारणारा फलंदाज बनला आहे. या यादीत डेव्हिड वॉर्नर 663 चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा 599 चौकारांसह चौथ्या स्थानावर आणि सुरेश रैना 506 चौकारांसह पाचव्या स्थानावर आहे.
चेन्नईविरुद्ध 47 धावांची इनिंग खेळली
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात कोहलीने 29 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 162.07 होता. कोहलीने कर्णधार फाफ डू प्लेसिससह पहिल्या विकेटसाठी 78 (58 चेंडू) धावांची भागीदारी केली.
कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या स्पर्धेतील 251 सामन्यांच्या 243 डावात फलंदाजी करताना त्याने 38.69 च्या सरासरीने आणि 131.95 च्या स्ट्राईक रेटने 7971 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 8 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत. कोहलीने 702 चौकार आणि 271 षटकार मारले आहेत.
ऑरेंज कॅपवर वर्चस्व कायम-
उल्लेखनीय आहे की आयपीएल 2024 मध्येही विराट कोहलीने डोक्यावर ऑरेंज कॅप घातली आहे. 14 सामन्यांच्या 14 डावात फलंदाजी करताना त्याने 64.36 च्या सरासरीने आणि 155.60 च्या स्ट्राईक रेटने 708 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके केली आहेत. कोहलीने 59 चौकार आणि 37 षटकार मारले आहेत.
बंगळुरुतील एम. चिन्नास्वामीचा राजा 'विराट कोहली'
विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही मैदानावर 3 हजार धावा करण्याचा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आलेला नाही. आकडेवारीवर नजर टाकली तर विराट कोहलीच्या जवळ कोणीही नाही. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर 2295 धावा केल्या आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स आहे. एबी डिव्हिलियर्सने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 1960 धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या:
आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार