RCB Vs KKR, IPL 2022: उमेश यादवची अप्रतिम कामगिरी, पावर प्लेमध्ये दोन विकेट्स घेऊन खास यादीत प्रवेश
TATA IPL 2022: आरसीबी आणि केकेआर (RCB Vs KKR) यांच्यात काल आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहावा सामना खेळण्यात आला होता.
TATA IPL 2022: आरसीबी आणि केकेआर (RCB Vs KKR) यांच्यात काल (30 मार्च 2022) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहावा सामना खेळण्यात आला होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेरीस आरसीबीनं बाजी मारली. दिनेश कार्तिकनं अखेरपर्यंत संयम दाखवत संघाला तीन विकेट्सनं विजय मिळवून दिला. केकेआरला पराभूत करून आरसीबीनं या हंगामातील पहिला विजय मिळवलाय. या विजयासह आरसीबीच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. हा सामना आरसीबीनं जिंकला असला तरी केकेआरचा हुकमी गोलंदाज उमेश यादवच्या कामगिरीची अधिक चर्चा रंगली आहे. आरसीबीविरुद्ध सामन्यात पावर प्लेमध्ये दोन विकेट्स घेऊन त्यानं दिग्गज गोलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय.
पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाच्या नावावर?
आरसीबीविरुद्ध सामन्यात उमेश यादवनं केकेआरचा सलामीवीर अनूज रावत आणि विराट कोहलीला बाद करून ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. या कामगिरीमुळं उमेश यादवनं पावर प्लेमध्ये 49 केट्स घेण्याचा विक्रम केलाय. या यदीत पंजाबचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 53 विकेट्सची नोंद आहे. त्यानंतर झहीर खान आणि भुवनेश्वर कुमार 52 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आता उमेश या यादीत उमेश यादवनं स्थान मिळवलंय.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात उमेश यादवची चमकदार कामागिरी
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात उमेश यादव दिल्लीच्या संघाचा भाग होता. परंतु, त्याला दिल्लीकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्लीच्या सघानं त्याला रिलीज केलं. त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये केकेआरच्या संघानं त्याला विकत घेतलं. या हंगामातील पहिल्याच सामन्यात त्यानं चेन्नई विरुद्ध दोन विकेट्स मिळवत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.
हे देखील वाचा-
- IPL 2022: केकेआरच्या पराभवाची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे!
- IPL 2022, KKR vs RCB : आरसीबीकडून पराभवानंतरही केकेआरच्या 'फायटींग' खेळीवर कर्णधार श्रेयस खुश, म्हणाला...
- RCB vs KKR : हर्षल पटेल ठरतोय आरसीबीचा सर्वात दमदार गोलंदाज, मागे टाकला दिग्गज डेल स्टेनचा रेकॉर्ड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha