IPL 2022 : बर्थडे बॉय रोहित आऊट झाला अन् पत्नीच्या डोळ्यात अश्रू तराळले! अश्विनच्या पत्नीचा रितिकाला आधार
RR vs MI, IPL 2022 Marathi News : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याच्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर मुंबई इंडियन्सने अखेर पहिला विजय साकारला.
Ravi Ashwin wife hugging Ritika Video: मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याच्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर मुंबई इंडियन्सने अखेर पहिला विजय साकारला. लागोपाठ आठ सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मुंबईने नवव्या सामन्यात विजय मिळवला. मुंबईने राजस्थानचा पराभव करत हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. पण मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप गेला. राजस्थानने दिलेल्या 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माच्या रूपाने मुंबईने पहिली विकेट गमावली. डावातील तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आर अश्विनने रोहितला डॅरिल मिशेलकरवी दोन धावांवर झेलबाद केले. यावेळी रोहित शर्मा आणि आर. अश्विन या दोघांच्या पत्नी स्टॅंडमध्ये उपस्थित होत्या.
बर्थडेच्या दिवशी रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर पत्नी रितिका निराश झाली होती. त्यावेळी तिच्या बाजूला उपस्थित असलेल्या अश्विनच्या पत्नी प्रिथीने तिला धीर दिला. प्रिथीने मिठी मारत रितिकाचे सांत्वन केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ -
Ashwin wife giving hug to ritika after Rohit wicket https://t.co/kq5XrkDiAT
— Jayesh #Rinku Stan acc (@Jayesh_2009) April 30, 2022
लागोपाठ आठ पराभवानंतर अखेर मुंबईने राजस्थानचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने राजस्थानचा पाच गड्यांनी पराभव केला. राजस्थान रॉयलने दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या भागिदारीच्या बळावर मुंबईने आपला पहिला विजय साकार केला. मुंबईचा संघ एका विजयासह गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या संघाने नऊ सामन्यात आठ पराभव स्वीकारले आहेत.
हे देखील वाचा-