![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cheteshwar Pujara: इंग्लंड दौऱ्यापूर्वी चेतेश्वर पुजारा चमकला, ससेक्ससाठी ठोकलं सलग तिसरं शतक
Cheteshwar Pujara: इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर दमदार कामगिरी करून सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
![Cheteshwar Pujara: इंग्लंड दौऱ्यापूर्वी चेतेश्वर पुजारा चमकला, ससेक्ससाठी ठोकलं सलग तिसरं शतक England County Championship: Cheteshwar Pujara's third ton in a row puts Sussex in command Cheteshwar Pujara: इंग्लंड दौऱ्यापूर्वी चेतेश्वर पुजारा चमकला, ससेक्ससाठी ठोकलं सलग तिसरं शतक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/30/ab2b8bd8115e8a935ca5db84dcb3dab4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cheteshwar Pujara: इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर दमदार कामगिरी करून सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. या स्पर्धेत पुजारानं ससेक्सकडून खेळताना सलग तिसरं शतक झळकावलं आहे. डरहमविरुद्ध शुक्रवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात पुजारानं तिसरं शतक झळकावलं आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 128 धावा करून नाबाद राहिला आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि पुजारा क्रिजवर उभे आहेत.
चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद रिझवान यांना सोबत फलंदाजी करताना पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना दोघांचा हा फोटो खूपच आवडला आहे. ससेक्सकडून खेळणारा भारतीय फलंदाज पुजारानं आतापर्यंत 5 सामन्यात 1 द्विशतकांसह 3 शतके झळकावली आहेत. पुजारानं डर्बीशायरविरुद्ध नाबाद 201 धावा करून सामना वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु, दुसऱ्या सामन्यात ससेक्सला 1 डाव आणि 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पण त्या सामन्यातही पुजारानं पहिल्या डावात 112 धावांचं योगदान दिलं होतं.
ट्वीट-
महत्वाचं म्हणजे, रिझवानसाठी काऊंटी क्रिकेट लीग खराब ठरली आहे. डर्बीशायरविरुद्धच्या सामन्यात रिझवान 22 धावा करून बाद झाला. याशिवाय दुसऱ्या सामन्याच्या दोन्ही डावात रिझवानला दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. मात्र, या सामन्यात पुजारासह फलंदाजी करणारा रिझवान मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. पुजारा आणि रिझवानचा सोबत फलंदाजी करतानाचा फोटो दोन्ही देशातील चाहत्यांना खूप आवडला. या फोटोवर दोन्ही देशातील क्रिकेट चाहते कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)