(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : आला रे आला!!! 'कॅप्टन कूल' धोनी आगामी आयपीएलसाठी चेन्नईत दाखल
MS Dhoni in Chennai for IPL 2023 : लवकरच आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे.
MS Dhoni in Chennai for IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premiere League) आयपीएलच्या (IPL) तयारीसाठी भारतीय स्टार क्रिकेटपटू आणि चार वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपरकिंग्स संघाचा (Chennai Super Kings) कर्णधार एम.एस. धोनी (MS Dhoni) चेन्नईमध्ये (Chennai) दाखल झाला आहे. लवकरच आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. 'थाला' धोनीचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. धोनीच्या स्वागतासाठी चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली होती.
आयपीएलच्या तयारीसाठी धोनीचं चेन्नईत
आयपीएल 2023 च्या तयारीसाठी एमएस धोनीचं चेन्नईत आगमन झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मार्चच्या अखेरीस सुरु होणार्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या तयारीसाठी धोनी चेन्नईला पोहोचला आहे. धोनी चेन्नई संघातील इतर खेळाडूंसह एमए चिदंबरम स्टेडियमवरील (MA Chidambaram Stadium) सरावात सामील होईल.
पाहा व्हिडीओ : धोनीचं ढोलाच्या तालावर वाजत-गाजत स्वागत
Welcome home Thala 💛 #MSDhoni pic.twitter.com/9oCgNsyk8V
— Dhoni Army TN™ (@DhoniArmyTN) March 2, 2023
धोनीचं विमानतळावर जंगी स्वागत
भारताचा माजी कर्णधार धोनीच्या आगमनाचा व्हिडीओ चेन्नईच्या फॅन क्लबने (CSK Fan Club) पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये धोनीचं जंगी स्वागत झाल्याचं दिसून येत आहे. विमानतळावर धोनीचं ढोलाच्या तालावर वाजत-गाजत स्वागत करण्यात आल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. धोनी विमानतळावर छोट्या चाहत्यांची भेट देत त्यांच्यासोबत फोटोही काढले.
चिमुकल्या चाहतीसोबत काढले फोटो
The Presence of Thala Dhoni in Chennai gives a different vibe. The excitement and emotions are a different Level! 💛🔥
— WhistlePodu Army ® - CSK Fan Club (@CSKFansOfficial) March 3, 2023
RT if you are one of those fans whose energy levels go up with MS Dhoni in Chennai. #Dhoni #CSK #WhistlePodu
📸 @ChennaiIPL pic.twitter.com/7CHYL8tsXu
31 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार
आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला मार्च महिन्याच्या शेवटी सुरुवात होणार आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे. 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :