(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG Vs DC: टी-20 क्रिकेटच्या ऐक्क्याची बिश्नोईपुढं शरणागती, फक्त सहा चेंडू खेळला अन् तीनवेळा गमावली विकेट्स
LSG Vs DC: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधराव्या सामन्यात लखनौ आणि दिल्लीचा एकमेकांशी भिडला. या सामन्यात लखनौच्या संघानं दिल्लीला सहा विकेट्सनं पराभूत केलं आहे.
LSG Vs DC: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधराव्या सामन्यात लखनौ आणि दिल्लीचा एकमेकांशी भिडला. या सामन्यात लखनौच्या संघानं दिल्लीला सहा विकेट्सनं पराभूत केलं आहे. लखनौच्या विजयात सलामीवीर आणि रष्टीरक्षक क्विंटन डी कॉकनं महत्वाची भूमिका बजावली. तर, रवी बिश्नोईनं दिल्लीच्या तडाखेबाज फलंदाज डेविड वॉर्नरची विकेट्स घेऊन मोठा पराक्रम केला. टी-20 क्रिकेटमध्ये भल्या भल्या गोलंदाजानं डेव्हिड वार्नरसमोर गुडघे टेकले आहेत. मात्र, रवी विश्नोईच्या गोलंदाजीसमोर त्याला संघर्ष करावा लागला आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये डेव्हिड वार्नरच्या नावावर 10 हजारांहून अधिक धावांची नोंद आहे. एवढेच नव्हेतर, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. परंतु,रवी विश्नोईच्या गोलंदाजीसमोर डेव्हिड वार्नर संघर्ष करताना दिसला आहे. डेव्हिड वार्नर आणि रवी बिश्नोई आतापर्यंत 3 वेळा आमने- सामने आले आहेत. दरम्यान, वॉर्नरनं बिश्नोईचे सहा चेंडू खेळले आहेत. या सहा चेंडूत त्यानं पाच धावा करत तीन वेळा आपली विकेट्स गमावली आहे. अर्थातच बिश्नोईनं सरासरी त्याच्या प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर वॉर्नरला बाद केलं आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांना गुजरातविरुद्ध पहिल्या सामन्यात पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यानंतर लखनौच्या संघानं जोरदार पुनारागमन करत सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यांनी चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीला पराभूत करत विजयाची हॅट्रीक केली आहे. या विजयासह लखनौच्या संघानं सहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-