Who is Aman Hakim Khan: अपघातानंतरही क्रिकेट सोडलं नाही, आयपीएलमध्ये पदार्पण करणारा अमन हाकीम खान आहे तरी कोण?
Who is Aman Hakim Khan: आयपीएल 2022 च्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदाराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांशी भिडले.
Who is Aman Hakim Khan: आयपीएल 2022 च्या 25व्या सामन्यात सनरायझर्स हैदाराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांशी भिडले. मुंबईमधील ब्रेबोर्न स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात हैदराबादनं कोलकातावर सात विकेटने दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय युवा खेळाडू अमन हाकिम खाननं कोलकात्याकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यात त्याला एक षटक टाकून 13 धावा देत एक विकेट्स मिळवली. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या अमननं तीन चेंडूत पाच धावा केल्या.
अमन खानचा जन्म 1996 रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे वडील मुंबईसाठी अंडर-19 क्रिकेट खेळले आहेत. महत्वाचं म्हणजे, एका रस्ता अपघातात अमन खानच्या दोन्ही पायाला दुखापत झाली होती. त्यानंतरही त्यानं क्रिकेट सोडलं नाही. दुखापतग्रस्त झाल्यानंतरही त्यानं 60 धावांची तुफानी खेळी केली होती. ज्यामुळं तो चर्चेत आला होता.आयपीएलच्या मेगा आक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं अमनला त्याची मूळ किंमत 20 लाखात खरेदी केलं. अमन खान अकरा वर्षाचा असताना मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये त्याची पहिल्यांदा श्रेयस अय्यरशी भेट झाली होती.
अमन खाननं गेल्या वर्षी मुंबईसाठी विजय हजारे ट्राफीतून 'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचवर्षी सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. अमन खाननं 'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये 6 टी-20 सामने खेळले आहेत. मात्र, या सामन्यात त्याला एकही विकेट्स मिळवता आली नाही. तसेच अ श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं एकदाच फलंदाजी केली आहे. ज्यात त्यानं 25 धावा केल्या होत्या. टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 48 धावा आहेत.
कोलकाताविरुद्ध सामन्यात हैदराबादचा सात विकेट्सनं विजय
हैदराबादने नाणेफक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर कोलकातानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादनं 18 व्या षटकातच तीन विकेट गमावून 176 धावा केल्या आणि सामना खिशात घातला. हैदराबादच्या विजयात राहुल त्रिपाठीनं महत्वाचं योगदान दिलं. त्यानं 37 चेंडूत 71 धावांची तुफानी खेळली.
हे देखील वाचा-
- Rahul Tripathi: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर घोंगावलं राहुल त्रिपाठी नावाचं वादळ, कोलकात्याच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडत रचले अनेक विक्रम
- MI Vs LSG, IPL 2022: सलग पाच पराभवानंतर मुंबईच्या संघात बदल होणार? 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
- IPL 2022: मुंबई अजूनही चॅम्पियन, पाच पराभवानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला...