(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020, MI vs SRH Preview: मुंबई इंडियन्सविरोधात होणाऱ्या आजच्या लढतीत हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक
हैदराबाद पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. 13 सामन्यांत 6 विजय प्राप्त केलेल्या हैदराबादने आजचा सामना जिंकला तर तो संघ प्ले ऑफसाठी आपली जागा निश्चित करु शकतो.
दुबई: आयपीएलमध्ये आपल्या शेवटच्या दोन सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसारख्या तगड्या संघाना पराभवाची धुळ चारणाऱ्या हैदराबादचा सामना आज मुंबई इंडियन्सशी आहे. गतसालचा विजेता आणि या हंगामातील सर्वात बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सला हैदराबादने आजच्या सामन्यात हारवल्यास तो प्ले ऑफ मध्ये धडक मारु शकतो. हैदराबादच्या संघाचा रनरेट हा कोलकाता आणि बेंगलोरच्या संघापेक्षा चांगला आहे आणि आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास ते अंतिम चार संघामध्ये आपले स्थान पक्के करु शकतात.
हैदराबादचा संघ पाचव्या स्थानी आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये हैदराबादचा संघ पाचव्या स्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 13 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. आता त्यांचे 12 गुण आहेत. आजच्या सामन्यात जर हैदराबाद जिंकली तर त्यांचे 14 गुण होतील आणि रनरेटच्या माध्यमातून ते तिसऱ्या स्थानी पोहचू शकतील.
हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने आजच्या सामन्यात जॉनी बेयरेस्टोच्या जागी ऋध्दिमान साहाला खेळवण्याचे निश्चित केले आहे. साहाने गेल्या दोन सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. त्याचबरोबर वॉर्नरने जेसन होल्डरचा सामावेश करुन संघामध्ये समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या विरोधात गेल्या सामन्यात शेवटच्या षटकांत होल्डर आणि संदीप शर्मा यांनी शानदार प्रदर्शन केले होते. त्यांच्यासोबत आता टी. नटराजन आणि राशिद खानच्या समावेशाने हैदराबादच्या गोलंदाजाची बाजू भक्कम झाली आहे.
मुंबईचा संघ बलाढ्य मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीतही मुंबईने दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीचा सहजपणे पराभव करुन प्ले ऑफमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रित बुमरा या दोघांनीही शानदार गोलंदाजी केली आहे. या दोघांनी मिळून या आयपीएलमध्ये 43 बळी घेतले आहेत. संघाचे नेतृत्व करणारा किरॉन पोलार्डने चांगला प्रभाव दाखवला आहे. ओपनिंगला येणारा ईशान किशनने आतापर्यंता चांगली फलंदाजी केली आहे.
मुंबई इंडिंयन्सचा संभाव्य संघ: क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कीरॉन पोलार्ड, जयंत यादव, कुणाल पांड्या, जेम्स पॅटिंसन, राहुल चाहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
सनराइजर्स हैदराबादचा संभाव्य संघ: डेविड वॉर्नर, ऋद्धिमान साहा, मनीष पांडे, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, टी नटराजन, शाहबाज नदीम.
महत्वाच्या बातम्या: