PBKS vs SRH Playing 11 : हैदराबाद अर्शदिपच्या फिरकीच्या जाळ्यात अडकणार की भुवनेश्वरची जादू चालणार? 'अशी' असेल प्लेईंग 11
PBKS vs SRH, Pitch Report : इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील 9 एप्रिल रोजी पंजाब (Punjab Kings) विरुद्ध हैदराबाद (Sunrisers Hyderabad) सामना दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे.
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर म्हणजे हा सामना खेळवला जाईल. 9 एप्रिल रोजी, रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील तेरावा सामना (IPL 2023 Match 13 ) पाहायला मिळेल. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पाहायला मिळणार आहे.
IPL 2023 : पंजाब आणि हैदराबाद आमने-सामने
पंजाब किंग्सने आयपीएल 2023 मध्ये वर्चस्व कायम ठेवलं आहे. यंदाच्या मोसमातील दोन्ही सामन्यांमध्ये पंजाबने विजयाची मालिका कायम ठेवली आहे. पंजाब किंग्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाबचा शिखर धवनने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात 56 चेंडूत नाबाद 86 धावांची दमदार खेळी केली. तर दुसरीकडे हैदराबाद संघाला पहिल्या सामन्यात राजस्थान आणि दुसऱ्या सामन्यात लखनौकडून पराभव पत्करावा लागला.
Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.
SRH vs PBKS Probable Playing XI : हैदराबाद विरुद्ध पंजाब संभाव्य प्लेईंग 11
PBKS Playing XI : पंजाब संभाव्य प्लेईंग 11
शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, शाहरुख खान, सॅम करन, ऋषी धवन, पी सिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चहर, नॅथन एलिस, अर्शदीप सिंह, के रबाडा
SRH Playing XI : हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11
मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), उमरान मलिक, आदिल रशीद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :