Shreyas Iyer : 'सामना हरलो, पण युद्ध अजून बाकी...', आरसीबीकडून लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरने दिले ओपन 'चॅलेंज'
PBKS vs RCB Qualifier 1 IPL 2025 : आयपीएल 2025 च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहून थेट क्वालिफायर-1 मध्ये प्रवेश केलेल्या पंजाब किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

PBKS vs RCB Qualifier 1 IPL 2025 : आयपीएल 2025 च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहून थेट क्वालिफायर-1 मध्ये प्रवेश केलेल्या पंजाब किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. प्लेऑफच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून 8 विकेट्सने पराभव पत्करला आणि थेट अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी गमावली. पण, या पराभवानंतरही पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने गर्जना करत असे काही म्हटले जे चर्चेचा विषय बनले आहे. सामना गमावल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, पंजाब संघाने सामना हरला, पण युद्ध अजून बाकी आहे.
आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?
आरसीबीविरुद्ध सामना गमावल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, 'खरंतर हा विसरण्याचा दिवस नाही, पण आपल्याला आता नवीन प्लॅन करावे लागतील. सामन्याच्या सुरुवातील आम्ही अनेक विकेट गमावल्या. त्यामुळे मागे जाऊन बरेच काही अभ्यासावे लागेल. मी या सामन्यातील माझ्या निर्णयांवर शंका घेत नाही. मैदानाबाहेर आपण जे काही प्लॅन केले ते योग्य होते. पण कधी कधी आपण ते मैदानावर अंमलात आणू शकलो नाही. मी गोलंदाजांनाही दोष देऊ शकत नाही, कारण बचाव करण्यासाठी धावसंख्या खूप कमी होती. आता आपल्या फलंदाजीवर काम करावे लागेल, विशेषतः या विकेटवर. येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये काही असमान उसळी दिसून आली आहे. तसे, आपण पराभवाचे हे कारण देऊ शकत नाही आणि त्याचा सामना करावा लागतो. आपण लढाई हरलो आहोत, पण युद्ध नाही.'
𝙏𝙝𝙖𝙩'𝙨 𝙝𝙤𝙬 𝙮𝙤𝙪 𝙨𝙚𝙖𝙡 𝙖 𝙥𝙡𝙖𝙘𝙚 𝙞𝙣 𝙩𝙝𝙚 𝙛𝙞𝙣𝙖𝙡𝙨 ❤
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
🎥 Captain Rajat Patidar fittingly finishes off in style as #RCB are just one step away from the 🏆
Updates ▶ https://t.co/FhocIrg42l#PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/hXhslIqcDZ
अय्यर स्वतः ठरला अपयशी!
श्रेयस अय्यरला क्वालिफायर 1 मध्ये कर्णधारपदाची खेळी खेळून अडचणीत सापडलेल्या संघाला वाचवण्याची संधी होती, परंतु त्याचा खेळ फक्त 3 चेंडूत संपला. जोश हेझलवूडच्या चेंडूवर तो खराब शॉट खेळून आऊट झाला. टी-20 स्वरूपात अय्यर हेझलवूडविरुद्ध चार वेळा बाद झाला आहे. फक्त कर्णधारच नाही तर पंजाबचा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहण्याची तसदी घेऊ शकला नाही. पंजाबचा एकही फलंदाज 30 धावांचा आकडाही गाठू शकला नाही, स्टोइनिसने सर्वाधिक 26 धावा केल्या. पंजाबचा संघ फक्त 101 धावा करू शकला आणि परिणामी आरसीबी 60 चेंडूंपूर्वी सामना जिंकला.
हे ही वाचा -





















