IPL 2025 : आकाश अंबानीकडून श्रेयस अय्यरला मिळाली ऑफर? सामना सुरू असताना बॉण्ड्री लाईनजवळ काय झालं बोलण?
Shreyas Iyer Chat with Akash Ambani : आयपीएल 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यात लखनौला हरवून आरसीबीने पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये आपली जागी निश्चित केली.

Shreyas Iyer Chat with Akash Ambani : आयपीएल 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यात लखनौला हरवून आरसीबीने पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये आपली जागी निश्चित केली, आता क्वालिफायर-1 मध्ये त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने लीग स्टेज पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 वर संपवला. त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव करून टॉप -2 मध्ये राहण्याची जागा पक्की केली. दरम्यान, या सामन्यात एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आकाश अंबानी अय्यरशी बोलताना दिसत आहे.
Poaching local boy for MI captaincy in next season by Ambani.
— Ex Home Minister of India (@arya_ekdeewana1) May 26, 2025
150cr+captaincy deal done ✅ #ShreyasIyer #MIvsPBKS #PBKSvsMI #AkashAmbani pic.twitter.com/jyP00a5NMi
आकाश अंबानी हा मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा आहे. तो जवळजवळ प्रत्येक सामन्यात संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर येतो. पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात तो जयपूरमध्येही होता. तो सीमारेषेवर बसला होता. या दरम्यान, जेव्हा श्रेयस अय्यर त्या बाजूला फिल्डिंग करायला गेला, तेव्हा त्याने अय्यरला काहीतरी सांगितले. अय्यर देखील सीमेपलीकडे बोर्डाच्या पाठिंब्यासह उभा होता आणि त्याच्याशी बोलत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. आता याच कारणामुळे अनेकजण दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल याबद्दलचे मजेदार पोस्ट चाहत्यांनी शेअर केले आहे.
MI owner Aakash Ambani trying to have a conversation with Shreyas Iyer during the match. 👀🤝#PBKSvsMI pic.twitter.com/4BlB6Iub4P
— CricXtasy (@CricXtasy) May 26, 2025
पंजाब किंग्जचा दणदणीत विजय! क्वालिफायर-1 मध्ये जागा निश्चित
जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 184 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 57 धावांची शानदार खेळी खेळली, पंजाबच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना जोश इंग्लिस (73), प्रियांश आर्य (62) यांनी उत्तम सुरुवात केली. श्रेयस अय्यरने विजयी शॉट मारला, पंजाब किंग्जने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आणि टॉप-2 मध्ये राहण्याची खात्री केली.
It seems Shreyas Iyer wasn't convinced with the deal Ambani offered...! pic.twitter.com/4JW2OA9pBZ
— Dinda Academy (@academy_dinda) May 26, 2025
आता पंजाबचा सामना क्वालिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल, ज्याने लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात लखनौला हरवले होते. पंजाब आणि बंगळुरूचे 14-14 गुण आहेत, परंतु नेट रनरेटच्या आधारावर, पंजाब (0.372) आरसीबी (0.301) पेक्षा चांगले आहे. क्वालिफायर 1 मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर होईल.
एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. गुजरातचे 18 आणि मुंबईचे 16 गुण आहेत. एलिमिनेटर सामना 30 मे रोजी मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
हे ही वाचा -





















