संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली, हिटमायर परतला, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2024 Eliminator: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानं एलिमेनटर सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकलाय.
RR vs RCB Live Score IPL 2024 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानं एलिमेनटर सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकलाय. संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एलिमेनटरचा हा सामना होत आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे नजरा लागल्या आहेत. आरसीबीची मदार फलंदाजांवर असेल, विराट कोहली, फाफ डू प्लेलिस आणि रजत पाटीदार लयीत आहेत. ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन आणि दिनेश कार्तिक फिनिशिंग करण्यात य़शस्वी ठरले. दुसरीकडे राजस्थानच्या ताफ्यात बोल्ट, आवेश खान, चहल आणि अश्विनसारखे भेदक गोलंदाज आहेत. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एलिमेनटर सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये जाईल. तर पराभूत संघाचे आव्हान येथेच संपुष्टात येईल. विजेता संघ 24 मे 2024 रोजी हैदराबादविरोधात चेन्नईमध्ये भिडणार आहे. त्यानंतर 26 मे रोजी फायनलची लढत होणार आहे.
🚨 Toss Update 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
Rajasthan Royals elect to bowl against Royal Challengers Bengaluru.
Follow the Match ▶️ https://t.co/b5YGTn6RZd#TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall pic.twitter.com/7zReTDiYP8
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेईंग XI :
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, यश दयाल, लॉकी फर्ग्यूसन, कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज
इम्पॅक्ट प्लेअर - स्वप्निल सिंह, अनुज रावत
राजस्थान रॉयल्स प्लेईंग XI :
संजू सॅमसन (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमॅन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर - शिमरोन हेटमायर
मैदानाची परिस्थिती काय ?
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक मानली जातेय. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा फायदा होतो. क्वालिफायर 1 सामन्यात कोलकात्याने हैदराबादचा 8 विकेटने पराभव केला होता.
Make way for the 👑
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
Ahmedabad goes Kohli..Kohli 🤩
Follow the Match ▶️ https://t.co/b5YGTn7pOL#TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall | @RCBTweets | @imVkohli pic.twitter.com/YCAxAubJav
हेड टू हेड काय आकडे ?
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएलमध्ये 31 वेळा आमने सामने आले आहेत. आरसीबीनं 15 मॅच जिंकल्या आहेत. तर, आरसीबीनं 13 मॅच जिंकल्या आहेत. तीन मॅचचा निकाल लागला नाही.