हसरंगा-हेजलवूड बाहेर, आरसीबी-राजस्थानच्या संघात बदल, पाहा प्लेईंग ११ अन् सर्वकाही
IPL 2023 : आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL 2023, RCB vs RR Playing XI : आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स घरच्या मैदानावर प्रथम गोलंदाजी करणार आहे. सवाई मानसिंह स्टेडियम जयपूरमध्ये राजस्तान आणि आरसीबी यांच्यात आमनासामना होत आहे. राजस्थान रॉयल्स 12 सामन्यात 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. तर आरसीबी १० गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघासाठी आजचा सामना निर्णायक आहे. आज सामना जिंकणारा संघ प्लेऑफच्या दिशेने आगेकूच होईल.. तर पराभूत संघाचे आव्हान अधिक खडतर होईल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीच्या संघात काही बदल करण्यात आले आहेत. आरसीबीने हेजलवूड आणि हसरंगा यांना प्लेईंग ११ मधून बाहेर बसवलेय. तर राजस्थानच्या संघातही बोल्टला बाहेर बसवण्यात आले आहे. आरसीबीने मायकल ब्रेसवेल आणि वेन पार्नेल यांना प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय. तर राजस्थानने अॅडम झम्पाला स्थान दिलेय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग ११ कशी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची प्लेईंग ११ -
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, वेन पार्नेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज
राजस्थान रॉयल्स संघाची प्लेईंग ११ -
यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमेयर, रविचंद्रन अश्विन, एडम जम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युजवेंद्र चहल
पॉईंट टेबलमध्ये दोन्ही संघ कोणत्या स्थानी?
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉईंटटेबलमधील स्थितीबाबत बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या संघानं त्यांच्या 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. तसेच, RCB 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. बंगळुरूच्या संघानं 11 सामन्यांत 5 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. दुसरीकडे, जर आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. पण घरच्या मैदानावर आरआरला पराभूत करणं आरसीबीसाठी सोपं नसणार आहे, एवढं मात्र नक्की
राजस्थान विरुद्ध बंगळुरू हेड टू हेड
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये राजस्थाननं 12 आणि बंगळुरूनं 14 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचा आजचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे, जिथे दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा भिडले आहेत. या सामन्यांमध्ये राजस्थाननं 4 तर बंगळुरूनं 3 सामने जिंकले आहेत.