RR vs PBKS, Playing 11 : गुवाहाटीमध्ये राजस्थान आणि पंजाब आमने-सामने, 'हे' 11 खेळाडू मैदानात उतरणार, खेळपट्टी कशी आहे?
RR vs PBKS, Pitch Report : राजस्थानच्या घरच्या मैदानावर 4 एप्रिल रोजी पंजाब विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील आठवा सामना खेळवला जाणार आहे.
Rajasthan Royals vs Punjab Kings, IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात बुधवारी सामना रंगणार आहे. या सामन्याचा यजमान राजस्थान संघाकडे आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानावर 4 एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील आठवा सामना (IPL 2023 Match 8 ) खेळवला जाणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) संघाने त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 72 धावांनी मोठा विजय मिळवला. दुसरीकडे, पंजाब किंग्सने त्यांच्या आयपीएल 2023 च्या मोहिमेच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सात धावांनी पराभव केला.
RR vs PBKS IPL 2023 Match 8 : पंजाब विरुद्ध राजस्थान लढत
दोन्ही संघांनी त्यांच्या मागील सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळी केली आहे. पंजाब किंग्सच्या भानुका राजपक्षेने 32 चेंडूत 50 धावा केल्या त्याआधी अर्शदीप सिंहने तीन षटकांत 3/19 धावा केल्या. राजस्थान रॉयल्ससाठी सॅमसन, जोस बटलर आणि यशश्वी जैस्वाल यांनी अर्धशतकं ठोकली, तर युझवेंद्र चहलने चार बळी घेतले.
RR vs PBKS IPL 2023 Match 8 : कधी आणि कुठे होणार सामना?
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात 5 एप्रिल रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर (Barsapara Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.
Barsapara Stadium Pitch Report : बरसापारा स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
बरसापारा स्टेडिअमची (Barsapara Stadium) खेळपट्टी (Pitch Report) मोठी धावसंख्या करणारी आहे. हे मैदान फलंदाजांसाठी फायदेशीर ठरतं. यावर सहज धावा होतात. फलंदाजाकडे ताकद आणि टायमिंग दोन्ही असेल आणि संयम असेल मोठे फटके मारता येतात. नाणेफेक हा देखील सामन्याचा महत्त्वाचा भाग असेल कारण अनेक संघांना प्रथम गोलंदाजी करायची आहे कारण, दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास मदत होते.
RR vs PBKS Probable Playing XI : राजस्थान विरुद्ध पंजाब संभाव्य प्लेईंग 11
Punjab Playing XI : पंजाब संभाव्य प्लेईंग 11
प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, सिकंदर रझा, सॅम कुरान, शाहरुख खान, नॅथन एलिस, हरप्रित ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंह
Rajsthan Playing XI : राजस्थान संभाव्य प्लेईंग 11
जोस बटलर (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल