![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
RR vs PBKS Match Preview : पंजाब आणि राजस्थान विजयी घोडदौड कायम ठेवणार? दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ मैदानात
Rajasthan Royals vs Punjab Kings : आयपीएल 2023 मध्ये आठवा सामना 5 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात होणार आहे.
![RR vs PBKS Match Preview : पंजाब आणि राजस्थान विजयी घोडदौड कायम ठेवणार? दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ मैदानात RR Vs PBKS IPL 2023 Match 8 Preview Head to head Rajasthan Royals vs Punjab Kings PBKS vs RR RR vs PBKS Match Preview : पंजाब आणि राजस्थान विजयी घोडदौड कायम ठेवणार? दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ मैदानात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/b9a85e5ddbf724bc2ff72be2bd8764381680598722487322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2023, RR vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier league) 2023 मध्ये आठवा सामना 5 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात होणार आहे. बुधवारी रंगणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ आयपीएल (IPL 2023) च्या सोळाव्या मालिकेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी लढतील. पंजाब (PBKS) आणि राजस्थान (RR) दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामना जिंकला आहे. बुधवारी राजस्थानमधील बरसापारा स्टेडिअम (Barsapara Stadium) वर हा संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.
पंजाब आणि राजस्थान विजयी घोडदौड कायम ठेवणार?
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्स (PBKS) दोन्ही संघ विजयी पॅटर्न मिळवून विजयी पॅटर्न सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात असतील. राजस्थान त्यांचा नेट रनरेट कायम ठेवून गुणतालिकेत पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. तर पंजाब गुणतालिकेत वरच्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यातील विजयानंतर दोन्ही संघाचा हा दुसरा सामना असेल.
RR vs PBKS Head-To-Head : राजस्थान विरुद्ध पंजाब हेड-टू-हेड
पंजाब आणि राजस्थान दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थानचं पारड जड आहे. राजस्थानने 14 सामने जिंकले असून पंजाबला 10 सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. या दोन्ही संघांनी सर्वाधिक 200 हून अधिक धावसंख्येचा आकडा गाठला आहे.
पंजाबचा कोलकातावर सात धावांनी विजय
आयपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knite Riders) विरोधात विजयी सुरुवात केली. मोहालीत झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या पंजाब (PBKS) संघाने कोलकाताचा (KKR) सात धावांनी पराभव केला. पंजाब किंग्सने डकवर्थ लुईस नियमानुसार कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पंजाब संघाने यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. पंजाबच्या विजयाचा खरा हिरो ठरला अर्शदीप सिंह (Arshdeep Singh). त्याने भेदक गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या.
राजस्थानकडून हैदराबादचा 72 धावांनी पराभव
राजस्थानने आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात हैदराबादचा दारुण पराभव केला. संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या विस्फोटक फलंदाजीनंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. यजुवेंद्र चहलने चार विकेट घेतल्या. त्यामुळे राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ फक्त 131 धावांचा पल्ला गाठू शकला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023, Dhoni : चेन्नईच्या विजयानंतरही धोनीनं गोलंदाजांना झापलं; कर्णधारपद सोडण्याचा इशारा, पण का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)