RR Vs LSG Toss Report: लखनौनं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
RR Vs LSG, Toss Report: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील वीसाव्या सामन्यात राजस्थान आणि लखनौचा संघ एकमेकांशी भिडणार आहे.
RR Vs LSG, Toss Report: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील वीसाव्या सामन्यात राजस्थान आणि लखनौचा संघ (Rajasthan Royals Vs Lucknow Super Giants) एकमेकांशी भिडणार आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात दोन युवा कर्णधार आमने- सामने येणार आहेत. युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) राजस्थानचं नेतृत्व करत आहेत. तर, केएल राहुलकडं (KL Rahul) लखनौच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागच्या सामन्यात राजस्थानला आरसीबीकडून चार विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. तर, लखौनच्या संघानं दिल्लीचा चार विकेट्सनं पराभव केला होता.
राजस्थान आणि लखनौच्या संघाची कामगिरी
राजस्थाननं आतापर्यंत तीन सामने खेळले असून दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पराभूत झाले आहेत. दुसरीकडं लखनौच्या संघाची सुरुवात चांगली झाल्याचं पाहायला मिळत आहे. लखौनं पहिला सामना गमवल्यानंतर अखेरच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ पाचव्या तर, लखौनचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
पिच रिपोर्ट
वानखेडे मैदानात सायंकाळी दुसऱ्या संघाच्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचण निर्माण होते. या मैदानात दव अधिक पडत असल्यामुळं प्रत्येक संघ प्रथम गोलंदाजी करणं पसंत करतात. प्रथम गोलंदाजी करुन विरुद्ध संघाला कमी धावात रोखण्याचा प्रयत्न असतो. त्यानंतर मिळालेलं लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करण्याची रणनीती नाणेफेक जिंकणाऱ्या संघाची असते. राजस्थानने आजवर वानखेडेच्या मैदानात खेळलेल्या 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला असून लखनौने खेळलेल्या एकमेव सामन्यात ते पराभूत झाले आहेत.
राजस्थानचा संघ-
जॉस बटलर, रॅसी व्हॅन डर डुसेन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर) शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.
लखनौचा संघ-
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
हे देखील वाचा-
- RCB on Virat Kohli Wicket: विराटला चुकीच्या पद्धतीनं आऊट देण्याच्या निर्णयावर आरसीबीची मोठी प्रतिक्रिया
- IPL 2022: चेन्नईच्या 'या' निर्णयावर रवी शास्त्रींनी उपस्थित केले प्रश्न, समोर ठेवली संघाची सर्वात मोठी चूक
- IPL 2022: विराटमुळं डेटवर जायची थांबली 'ही' तरूणी! भरमैदानात पोस्टर झळकावून सांगितलं कारण, पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या