एक्स्प्लोर

RR vs DC, IPL 2023 Live : राजस्थानचा दिल्लीवर 57 धावांनी विजय

IPL 2023, Match 11, RR vs DC : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आज लढत होणार आहे. दिल्ली पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.

LIVE

Key Events
RR vs DC, IPL 2023 Live : राजस्थानचा दिल्लीवर 57 धावांनी विजय

Background

 RR vs DC Live Score : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) लढत पाहायला (RR vs DC IPL 2023 Match 11) मिळणार आहे. गुवाहाटीमध्ये 8 एप्रिल रोजी बरसापारा स्टेडिअमवर (Barsapara Stadium) सामना रंगणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचा हा तिसरा सामना असेल. त्यांचा याआधीच्या पहिल्या सामन्यात विजय आणि दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

DC vs RR Match 11 Preview : दिल्ली आणि राजस्थान आमने-सामने

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचा यंदाच्या मोसमातील तिसरा सामना आहे. दिल्ली (DC) संघाला प्रतिस्पर्धी राजस्थान (RR) चा पराभव कडून खातं उघडण्याची संधी आहे. राजस्थान संघाला घरच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममधील परिस्थितीची चांगली सवय झाली आहे. असं असलं तरी, पंजाब किंग्स (PBKS) विरुद्धचा त्यांचा मागच्या सामन्यात झालेला पराभव लक्षात घेता दिल्ली विरुद्ध विजय मिळवून त्यांना स्पर्धेत पुन्हा स्थान मिळवता येईल.

DC vs RR, Head to Head : कुणाचं पारड जड?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आतापर्यंत 26 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये दोन्ही संघाची स्थिती सारखी आहे. 26 सामन्यांपैकी राजस्थान आणि दिल्ली दोन्ही संघानी प्रत्येकी 13 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 होती. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. 

Barsapara Stadium Pitch Report : बरसापारा स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

बरसापारा स्टेडिअमची (Barsapara Stadium) खेळपट्टी (Pitch Report) मोठी धावसंख्या करणारी आहे. हे मैदान फलंदाजांसाठी फायदेशीर ठरतं. यावर सहज धावा होतात. फलंदाजाकडे ताकद आणि टायमिंग दोन्ही असेल आणि संयम असेल मोठे फटके मारता येतात. नाणेफेक हा देखील सामन्याचा महत्त्वाचा भाग असेल कारण अनेक संघांना प्रथम गोलंदाजी करायची आहे कारण, दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास मदत होते.

RR vs DC IPL 2023 Match 11 : कधी आणि कुठे होणार सामना?

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात 8 एप्रिल रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर (Barsapara Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

19:30 PM (IST)  •  08 Apr 2023

राजस्थानचा दिल्लीवर 57 धावांनी विजय

RR vs DC, IPL 2023 : सांघिक कामगिरीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीवर रॉयल विजय मिळवला. 200 धावांचा बचाव करताना राजस्थानने दिल्लीला 142 धावांवर रोखत 57 धावांनी विजय मिळवला. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे राजस्थानने विराट विजय मिळवला. दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव होय. या पराभवामुळे दिल्ली गुणतालिकेच्या तळाशी पोहचली आहे. राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 142 धावांपर्यंत मजल मारु शकली. 

18:47 PM (IST)  •  08 Apr 2023

दिल्लीचा अर्धा संघ तंबूत, अक्षर पटेल बाद

दिल्लीचा अर्धा संघ तंबूत, अक्षर पटेल बाद. डेविड वॉर्न एकाकी झुंज देत आहे. 

18:37 PM (IST)  •  08 Apr 2023

दिल्लीचा चौथा धक्का, ललीत यादव तंबूत

दिल्लीचा चौथा धक्का, ललीत यादव तंबूत

17:59 PM (IST)  •  08 Apr 2023

दिल्लीची फलंदाजी ढासळली, तिसरी विकेट पडली

दिल्लीची फलंदाजी ढासळली, तिसरी विकेट पडली

17:53 PM (IST)  •  08 Apr 2023

दिल्लीला दोन धक्के, पृथ्वी शॉ पुन्हा फेल

200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ आणि मनिष पांडे शून्यावर बाद झाले.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP MajhaAjit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
Embed widget