Dhoni Direct Hit : धोनीचा 'डॅशिंग' अंदाज, डायरेक्ट हिट करत जुरेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं
Dhoni's Direct Hit From Behind Stumps : चेन्नईचा कर्णधार धोनीनं राजस्थानचा फलंदाज ध्रुव जुरेललं डायरेक्ट थ्रो करत आऊट केलं. हा क्षण पाहणारे सगळेच चकित झाले होते.
Dhoni Run-out Jurel by Direct Hit : जयपूरच्या मानसिंग स्टेडिअमवर आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 37 वा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान संघाने चेन्नई संघाचा 32 धावांनी पराभव केला. या सामन्यात 'कॅप्टन कुल' महेंद्र सिंह धोनी 'डॅशिंग' अंदाज पाहायला मिळाला. धोनीनं डायरेक्ट हिट करत राजस्थानच्या शानदार फलंदाज ध्रुव जुरेलला बाद केलं. ही विकेट चेन्नईसाठी फार महत्त्वाची होती. कारण जुरेल फार वेगाने धावा करत होता. 41 वर्षांच्या धोनीला या जोमानं खेळताना पाहून चाहत्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. धोनीनं राजस्थानचा फलंदाज ध्रुव जुरेललं डायरेक्ट थ्रो करत आऊट केलं.
CSK vs RR, Dhoni Direct Hit : एमएस धोनीचा 'डॅशिंग' अंदाज
दरम्यान, हा क्षण पाहणारे सगळेच चकित झाले होते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेत आहे. धोनीनं जुरेललं डायरेक्ट थ्रो करत आऊट केल्यावर प्रेक्षकांमध्ये धोनीच्या नावाची घोषणाबाजी सुरु होती. राजस्थान रॉयल्सच्या विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीची नेहमी प्रमाणेच शानदार विकेटकिपिंग पाहायला मिळाली. धोनी डायरेक्त हिट करत राजस्थानचा स्फोटक फलंदाज ध्रुव जुरेलला बाद केलं. विकेटच्या मागे असलेल्या धोनीनं चेंडू अडवला आणि तो विकेटच्या दिशेने फेकला. चेंडू थेट विकेटला लागला आणि ज्युरेलला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
पाहा व्हिडीओ :
— Guess Karo (@KuchNahiUkhada) April 28, 2023
Dhoni Direct Hit : डायरेक्ट हिट करत जुरेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं
राजस्थानच्या डावात मथिसा पाथिराना शेवटचे षटक टाकत होता. देवदत्त पड्डिक्कल स्ट्राईकवर होता. त्याने चेंडू मागच्या दिशेने मारला. धोनीने चेंडू अडवला. यावेळी नॉन स्ट्राइकवर उभा असलेला जुरेल धावा काढण्यासाठी गेला पण त्याआधीचं धोनीनं चेंडू विकेटच्या दिशेने डायरेक्ट थ्रो करत जुरेलला बाद केलं. ज्युरेलपर्यंत पोहोचेल असे पड्डिक्कल यांना वाटले. ज्युरेलने अवघ्या 15 चेंडूत 34 धावांची शानदार खेळी केली.
Direct hit.. with gloves on ??
— Mahi (@mahiban4u) April 27, 2023
Definitely not an easy task
MS Dhoni for a reason #BestWicketKeeperBatsmanStill#CSKvRR pic.twitter.com/py5cETcEZa
IPL 2023, CSK vs RR : चेन्नईचा राजस्थानकडून 32 धावांनी पराभव
राजस्थानने चेन्नईचा 32 धावांनी पराभव केला. शिवम दुबे याने वादळी अर्धशतकी खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यास अपयश आले. राजस्थानने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सहा विकेटच्या मोबदल्यात 170 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईच्या पाच विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Dhoni Angry Moment : सामन्यात दिसलं 'कॅप्टन कुल'चं रौद्ररुप; भरमैदानात भडकला धोनी, अन्...