RR vs CSK, Match Highlights: दुबेची अर्धशतकी खेळी व्यर्थ, राजस्थानच्या फिरकीची कमाल, चेन्नईचा 32 धावांनी पराभव
IPL 2023, RR vs CSK: अॅडम झम्पा आणि आर. अश्विन यांच्या फिरकीच्या जोरावर राजस्थानने चेन्नईचा ३२ धावांनी पराभव केला.
IPL 2023, RR vs CSK: अॅडम झम्पा आणि आर. अश्विन यांच्या फिरकीच्या जोरावर राजस्थानने चेन्नईचा ३२ धावांनी पराभव केला. शिवम दुबे याने वादळी अर्धशतकी खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यास अपयश आले. राजस्थानने दिलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सहा विकेटच्या मोबदल्यात १७० धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईच्या पाच विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरलाय. राजस्थान रॉयल्सचा आज २०० वा आयपीएल सामना होता..
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी संयमी सुरुवात केली. पावरप्लेमध्ये ऋतुराज गायकवाड आक्रमक फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या बाजूला असणाऱ्या कॉनवेची बॅट शांतच होती. कॉनवे याने १६ चेंडूत फक्त आठ धावा काढल्या. कॉनेला अॅडम झम्पा याने बाद केले. त्यानंतर ऋतुराज गायकाडही बाद झाला. ऋतुराज गायकवाड याने २९ चेंडूत ४७ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत गायकवाड याने पाच चौकार लगावले तर एक षटकार लगावला. चेन्नईला पावरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभरता आली नाही, हे पराभवाचं एक कारण असल्याचे सामन्यानंतर धोनीने सांगितले.
सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर अजिंक्य रहाणेही लगेच तंबूत परतला. रहाणे याने १३ चेंडूत १६ धावांचे योगदान दिले. अंबाती रायडू आजच्या सामन्यातही इम्पॅक्ट पाडू शकल नाही. रायडूला खातेही उङडता आले नाही. रायडू बाद झाल्यानंतर शिवब दुबे आणि मोईन अली यांनी डाव सावरला. दोघांनी झटपट धावा काढल्या. पण झम्पा याने मोईन अलीला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला. मोईन अली याने १२ चेंडूत २३ धावा चोपल्या. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकार लगावले.
मोईन अली बाद झाल्यानंतर शिवब दुबे याने रविंद्र जाडेजासोबत चेन्नईची धावसंख्या वाढवली. पण अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शिवम दुबे बाद झाला. दुबे याने वादळी अर्धशतक झळकावले. दुबे याने ३३ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या खेळीत दुबे याने चार खणखणीत षटकार लगावले. तर दोन चौकार लगावले. रविंद्र जाडेजा याने नाबाद २३ धावांची खेळी केली. या खेळीत जाडेजाने तीन चौकार लगावले.
राजस्थानच्या फिरकी गोलंदाजांनी भेदक मारा केला. अश्विनने दोन विकेट घेतल्या तर झम्पा याने तीन विकेट घेतल्या. संदीप शर्माने चार षटकात फक्त २४ धावा दिल्या. तर कुलदीप यादव याने तीन षटकात १८ धावा खर्च केल्या. कुलदीप यदव याने एक विकेट घेतल्या.