IPL Playoffs Scenario : 9 सामने, 9 संघ... प्लेऑफमध्ये प्रत्येकाला संधी, पाहा नेमकं समिकरण
IPL Playoffs Scenario : दिल्ली वगळता इतर 9 संघांचे प्लेऑफचे आव्हान जिवंत आहे. नऊ सामने बाकी आहेत... नऊ संघाचे प्लेऑफमधील आव्हान जिवंत आहे.
IPL Playoffs Race : रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यामुळे प्लेऑफची रेस आणखी वाढली आहे. दुपारी झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानचा 112 धावांनी पराभव केला. या विराट विजयामुळे आरसीबीच्या नेटरनरेटमध्ये फायदा झालाय. संध्यकाळी चेन्नईचा पराभव झाल्यामुळे इतर संघांना फायदा झालाय. या दोन्ही सामन्यानंतर प्लेऑफमधील समिकरणे बदलली आहेत. दिल्ली वगळता इतर 9 संघांचे प्लेऑफचे आव्हान जिवंत आहे. नऊ सामने बाकी आहेत... नऊ संघाचे प्लेऑफमधील आव्हान जिवंत आहे. काही संघांना थेट प्रवेश मिळण्याची संधी आहे तर काही संघांना इतरांवर अवलंबून राहायचेय. हार्दिक पांड्यांच्या नेतृत्वातील गुजरात संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
सनराइजर्स हैदराबद प्लेऑफमध्ये पोहचणार का ?
गुजरात टायटन्स 16 गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. सोमवारी गुजरातने हैदराबादचा पराभव केला तर पहिला क्वालिफायर मिळेल. दुसरीकडे हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. जर हैदराबादने गुजरातचा पराभव केला स्पर्धा अधिक रंगतदार होईल. जर हैदराबादने उर्वरित सर्व सामने जिंकले तरीही त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हैदराबादला तिन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल.
9 संघ अद्याप प्लेऑफच्या स्पर्धेत -
आरसीबीने राजस्थानचा दारुण पराभव केला. या पराभवामुळे राजस्थानचा नेटरनरट घरसलाय. तर विराट विजयामुळे आरसीबीचा रनरेट सुधारलाय. आरसीबी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. राजस्थानचा पराभव केल्यामुळे आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राहिलेय. तर राजस्थानचे आव्हान खडतर झालेय. लखनौ संघ 13 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी लखनौला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. लखनौला मुंबई आणि कोलकाताविरोधात सामने खेळायचे आहेत.
चेन्नईची स्थिती काय ?
चेन्नईने 13 सामन्यात 15 गुणांची कमाई केली आहे. चेन्नईने सात सामन्यात विजय मिळवलाय. तर एक सामना अनिर्णित राहिलाय. चेन्नईचा अखेरचा सामना दिल्लीबरोबर आहे. हा सामना चेन्नईला जिंकणे अनिवार्य आहे. चेन्नईने दिल्लीचा पराभव केल्यास त्यांचे 17 गुण होतील.. ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. पण जर चेन्नईला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहवे लागेल...
चेन्नईच्या पराभवाचा मुंबईला फायदा -
मुंबई सध्या 12 सामन्यात 14 गुण आहेत. मुंबईचे आणखी दोन सामने बाकी आहेत. मुंबईने उर्वरित दोन्ही सामने जिंकून 18 गुणांपर्यंत मजल मारता येईल. यासह मुंबईला आघाडीच्या दोन स्थानापर्यंत पोहचता येईल. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर राहिल्यास संघाला एक अतिरिक्त संधी मिळेल. मुंबईचे उर्वरित सामने हैदराबाद आणि लखनौ संघासोबत आहे. या दोन्ही सामन्यात मुंबईने बाजी मारल्यास मुंबई क्वालिफायर एक साठी पात्र होईल. चेन्नईने कोलकात्याचा पराभव करुन दिल्लीविरोधातील सामनाही जिंकला असता तर मुंबईला टॉप 2 मध्ये प्रवेश करता आला नसता.. त्यामुळे चेन्नईच्या पराभवाचा फायदा मुंबईला झालाय.
पंजाबचे गणित काय ?
पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. पंजाबचे उर्वरित सामने राजस्थान आणि दिल्लीविरोधात आहे. दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे. तर राजस्थानचे संपल्यात जमा आहे. त्यामुळे या दोन्ही सामन्यात पंजाबला विजय मिळवणे कठीण असेल. या दोन्ही सामन्यावर पंजाबचे प्लेऑफचे तिकीट मिळणार आहे.
उर्वरित सामने कोणते राहिलेत ?
15 मे 2023 - गुजरात vs हैदराबाद
16 मे 2023 - लखनौ vs मुंबई
17 मे 2023 - पंजाब vs दिल्ली
18 मे 2023 - हैदराबाद vs आरसीबी
19 मे 2023 - पंजाब vs राजस्थान
20 मे 2023 - दिल्ली vs चेन्नई (दुपारी 3.30)
- कोलकाता vs लखनौ
21 मे 2023 - मुंबई vs हैदराबाद
- आरसीबी vs गुजरात