सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हार्दिकने घोषणा दिल्या!
IPL 2024 Mumbai Indians: मुंबईने पंजाब किंग्सला पराभूत करत यंदाच्या हंगामातील तीसरा विजय मिळवला होता.
IPL 2024 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने18 एप्रिलला यंदाच्या सत्रातील आपला तिसरा विजय मिळवताना पंजाब किंग्सला 9 धावांनी पराभूत केले. पंजाबच्या आशुतोष शर्माने अर्थशतक झळकावत एक वेळ पंजाबच्या विजयाचे चित्र निर्माण केले; परंतु जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झीने निर्णायक मारा करत मुंबईला विजयी केले.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा आक्रमक चांगली सुरुवात केली. त्याने 25 चेंडूत 36 धावा केल्या. तर तिलक वर्माने 18 चेंडूत 34 धावा झळकावल्या. मुंबईसाठी विशेष कामगिरी केली ती म्हणजे सूर्यकुमार यादवने. सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकामुळे मुंबईला मोठी धावसंख्या गाठता आली. मुंबईच्या या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन करण्यात आले.
मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी यांनी ड्रेसिंग रुममध्ये सूर्यकुमार, बुमराह आणि कोएत्झीचे कौतुक केले. यानंतर मुंबई इंडियन्स, मुंबई इंडियन्स असं म्हणत सर्व खेळाडूंनी घोषणा दिल्या. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित, हार्दिकने एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे दिसून येत आहे. बाजूला गोलंदाजी प्रशिक्षक मलिंगा देखील आहे.
🗣️ We say "𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢", you say "𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧𝐬" 🔥#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/zDSWx8hjjE
— Mumbai Indians (@mipaltan) April 19, 2024
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला-
दुसऱ्या डावाचा म्हणजेच मुंबईच्या गोलंदाजीदरम्यानचा आहे, जेव्हा पंजाब किंग्सला शेवटच्या षटकांत विजयासाठी 12 धावांची गरज होती. या कालावधीत पंजाब किंग्सने 9 विकेट गमावल्या होत्या. मुंबईसाठी शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आकाश माधवालला सोपवण्यात आली. पण षटक सुरू होण्यापूर्वी आकाश कर्णधार हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार रोहित शर्मासोबत उभा राहून बोलताना दिसत आहे.
During last over Akash Madhwal ignored hardik and listening to Ro and setting the Field 😂 pic.twitter.com/PhFGRijcq6
— Lucky (@lucky22076) April 18, 2024
कोण कुठल्या स्थानी?
आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या राजस्थानचा संघ अव्वल स्थानी आहे. राजस्थानचे 7 सामन्यात 6 विजयासह 12 गुण आहेत. कोलकाता 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून या संघाने 6 सामन्यात 4 विजय मिळवले आहे. लखनौविरुद्धच्या पराभवानंतरही चेन्नईचा संघ 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. चेन्नने 7 सामने खेळले असून यामध्ये 4 विजय आणि 3 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करायला लागला. तर 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर हैदराबादचा संघ आहे. हैदराबादने एकूण 6 सामने खेळले असून यात 4 सामन्यात विजय मिळवला आहे. पाचव्या क्रमांकावर 8 गुणांसह लखनौचा संघ आहे. लखनौने 7 सामन्यात 4 विजय मिळवले आहे. तसेच दिल्लीचा संघ 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीने 7 सामन्यात 3 विजय मिळवले आहे. तर 4 सामन्यात दिल्लीचा पराभव झाला आहे. मुंबईचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईचे 6 गुण आहेत. मुंबईने एकूण 7 सामने खेळले असून यात 3 सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभव झाला आहे. आठव्या क्रमांकावर 6 गुणांसह गुजरातचा संघ आहे. गुजरातने आतापर्यंत 7 सामने खेळले असून यामध्ये 3 सामन्यात विजय तर 4 सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करायला लागला आहे. पंजाबचा संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर बंगळुरुचा संघ 2 गुणांसह तळाला म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरुने 7 सामन्यात फक्त 1 विजय मिळवला आहे.
संबंधित बातम्या:
सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!