एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहित शर्माला वर्ल्ड कपपूर्वी ब्रेकची गरज, मायकल क्लार्कनं कारण सांगितलं अन् पुढे म्हणाला हिटमॅनला एक काम करावं लागेल...

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माला ब्रेकची गरज असल्याचं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कनं केलं आहे. रोहितला ब्रेक मिळणार नाही असं देखील तो म्हणाला.

नवी दिल्ली :  वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं (T-20 World Cup) आयोजन करण्यात आलं असून 1 जून ते 30 जून दरम्यान क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना चार गटात विभागण्यत आलं आहे. भारताचा संघ अ गटात असून त्यासोबत पाकिस्तान देखील आहे. बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) संघाचं नेतृत्त्व देण्यात आलं आहे. रोहित सोबत विराट कोहलीला देखील संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या आयपीएलमधील कामगिरीचा आढावा घेत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूनं मोठं वक्तव्य केलंय. रोहित शर्माला ब्रेकची गरज असल्याचं मायकल क्लार्कनं (Michael Clarke) म्हटलं आहे. क्लार्कनं यासाठी काही कारणं देखील सांगितली आहेत.   

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं रोहित शर्मा थकलेला वाटत असल्याचं म्हटलंय. रोहित शर्माला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी ब्रेकची गरज आहे. ब्रेक घेतल्यास तो टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यापूर्वी पूर्ण ताकदीनं उतरेल, असं मायकल क्लार्कनं म्हटलं. 

रोहित शर्मा टीम इंडियाचं आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये नेतृत्त्व करणार आहे. आयपीएलच्या कामगिरीचा विचार केला असता मुंबई इंडियन्सच्या गेल्या पाच मॅचेसचा विचार केला असता रोहित शर्मा त्यामध्ये चारवेळा 10 चा टप्पा देखील पर करु शकलेला नाही. 

रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी मालिकेनंतर आयपीएलमध्ये सहभागी झाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा देखील आयपीएलमधील प्ले ऑफच्या शर्यतीतील प्रवास जवळपास संपुष्टात आलाय. रोहित शर्मानं त्याच्या कामगिरीचं मूल्यमापन केल्यास त्याला कळेल की चांगल्या सुरुवातीनंतर त्याची कामगिरी निराशाजनक ठरली, असं मायकल क्लार्क म्हणाला. 

रोहितला ब्रेक मिळणार नाही...

मायकल क्लार्क पुढे म्हणाला की मला असं वाटतं की रोहित शर्मला थोड्या प्रमाणात थकवा जाणवत असेल. मायकल क्लार्क स्टार स्पोर्टसशी बोलत होता. 

रोहित शर्मानं ब्रेक घेतल्यास त्यासाठी ते महत्त्वाचं ठरेल. मात्र, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे.रोहितला ब्रेक मिळणार नाही. त्यामुळं रोहित शर्माला फॉर्ममध्येच परतावं लागणार आहे, असं मायकल क्लार्क म्हणाला.  

दरम्यान, आयपीएलच्या प्ले ऑफमधील मुंबई इंडियन्सच्या प्रवेशाची शक्यता जवळपास संपल्यात जमा आहे. मुंबई गुणतालिकेत सध्या नवव्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : संजू सॅमसनसोबत चिडीचा डाव, त्या वादग्रस्त झेलनंतर भरमैदानात गोंधळ

RR vs DC : संजू सॅमसननं दिल्लीच्या विजयाचं क्रेडिट कुलदीप, मॅक्गर्क नव्हे तिसऱ्याच खेळाडूला दिलं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget