IPL 2022: 'हा' खेळाडू भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार असेल, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगनं भारतीय संघाच्या कर्णधाराबाबत मोठं भाष्य केलंय. युवा फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत हा भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होईल, असाही विश्वास त्यांनं व्यक्त केलाय.
IPL 2022: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगनं भारतीय संघाच्या कर्णधाराबाबत मोठं भाष्य केलंय. युवा फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत हा भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होईल, असाही विश्वास रिकी पाँटिंगनं व्यक्त केलाय. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि युवराज सिंह यानंही ऋषभ पंत भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतो असा विश्वास दाखवलाय.
ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीची कामगिरी
आयपीएलच्या मागच्या हंगागात श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानं ऋषभ पंतकडं दिल्लीच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलं होतं. ऋषभपंतच्या नेतृ्त्वात दिल्लीच्या संघानं चांगली कामगिरी बजावून दाखवली होती. दरम्यान, साखळी सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करून दिल्लीनं प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. यंदाही ऋषभ पंत दिल्लीच्या संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे. या हंगामात दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतो? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
रिकी पाँटिंग काय म्हणाला?
आयपीएल सारख्या स्पर्धेत कर्णधाराचा अनुभव प्राप्त झाल्यानंतर ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करू शकतो, याबाबत काहीही शंका नाही. एवढेच नव्हेतर, रिकी पॉंटिंगनं ऋषभ पंतची तुलना आयपीएलचा पाच वेळा खिताब जिंकलेल्या मुंबईचा कर्णधार रोहित शर्माशी केलीय.ऋषभ पंतचे आकडे रोहित शर्माला मागे सोडण्याच्या दिशेनं वाटचाल करीत आहेत. याबाबत मी जास्त विचार केला नाही, परंतु असं मला वाटतं आहे. जेव्हा रोहित शर्मानं मुंबईच्या संघाची धुरा संभाळली, तेव्हा तो खूपच लहान होता आणि त्यानं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.तो 23-24 वर्षांचा असेल. याच गोष्टी रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यातील साम्य दर्शवतात.
ऋषभ पंतनं आतापर्यंत 43 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 84 आयपीएलचे सामने खेळले आहेत. टी-20 आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 24.4 च्या सरासरीनं 683 धावा केल्या आहेत. तर, आयपीएलमध्ये 35.2 च्या सरासरीनं 2 हजार 498 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022: चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी
- PAK VS AUS: बाप को भेज, तेरे बस की बात नही! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानचे चाहते भडकले
- IPL 2022: श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी! एकानं वनडेत चोपलं, दुसऱ्यानं कसोटीत धुतलं, आज दोघंही आमने-सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha