IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार, कर्णधार दिसणार ऑक्शन टेबलवर
Rishabh Pant In IPL Auction : दुबईमध्ये आज आयपीएलचा (IPL 2024) लिलाव पार पडणार आहे. या लिलावात पहिल्यांदाच एखाद्या संघाचा विद्यमान कर्णधार उपस्थित राहणार आहे.
Rishabh Pant In IPL Auction : दुबईमध्ये आज आयपीएलचा (IPL 2024) लिलाव पार पडणार आहे. या लिलावात पहिल्यांदाच एखाद्या संघाचा विद्यमान कर्णधार उपस्थित राहणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (delhi capitals) लिलावात पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहे. ऋषभ पंत (delhi capitals) दुबईमध्ये दाखल झालाय. दुबईच्या कोका कोला एरिनामध्ये होणाऱ्या लिलावात ऋषभ पंत सहभागी होणार आहे.
आयपीएल लिलावात (IPL Auction) पहिल्यांदाच एखादा कर्णधार सहभागी होतोय. याआधी कोणत्याही संघाने लिलावासाठी कर्णधाराला पाठवलं नाही. 2008 मध्ये आयपीएलला सुरुवात झाली, तेव्हापासून एकाही संघाकडून कर्णधार ऑक्शन टेबलवर उपस्थित नव्हता. पहिल्यांदाच एखादा कर्णधार लिलावासाठी उपस्थित राहणार आहे. ऋषभ पंत याच्यासोबत दिल्लीचा कोच रिकी पाँटिंगही हजर असेल.
ऑक्शन प्लॅनिंगचा भाग राहणार पंत
क्रिकबज संकेतस्थळाच्या रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंत ऑक्शन टेबलवर हजर राहणार आहे. पंत दिल्लीचा कोच रिकी पाँटिंग याच्यासोबत ऑक्शन हॉलमध्ये दिसेल. ऑक्शन हॉलमध्ये पंत हजर राहणार, याबाबतची माहिती दिल्लीच्या फ्रेचांयझीकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंत दिल्लीच्या संघाची कमान संभाळणार असल्याचेही त्या सदस्याने सांगितले.
RISHABH PANT IS BACK....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) December 19, 2023
- He will be in the auction table for Delhi Capitals. 🔥pic.twitter.com/bakkOWPu88
सुत्रांच्या माहितीनुसार, ऋषभ पंत मागील काही वेळापासून दिल्लीच्या ऑक्शन प्लॅनिंगचा महत्वाचा भाग राहिलाय. तो कोच रिकी पाँटिंग याच्यासोबत संघाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिलाय.
वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर -
गेल्यावर्षी ऋषभ पंत याचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातामधून ऋषभ पंत थोडक्यात बचावला होता. तेव्हापासून पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून पंत याने पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली आहे. एनसीएमध्ये पंतने आपल्या फिटनेसवर काम केलेय. फलंदाजी आणि विकेटकिपिंग करतानाचे पंतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पंत काय म्हणाला ?
भीषण अपघातामधून वाचलो, हे माझं नशीबच होय. दुखापतीमधून सावरण्यासाठी खूप मोठा कालावधी गेलाय. अपघात झाला तेव्हा प्रचंड वेदनांचा सामना केला. सध्या परिस्थिती ठिक आहे, असे ऋषभ पंत म्हणाला.
ऑक्शन हॉलमध्ये दिसणार दिग्गज -
आयपीएलच्या मिनी लिलावासाठी दहा संघाचे सदस्य दुबईमध्ये पोहचले आहेत. यंदा लिलावाच्या टेबलवर अनेक मोठे चेहरे दिसतील. यामध्ये भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर याचाही समावेश आहे. गौतम गंभीर कोलकात्यासाठी ऑक्शन टेबलवर हजर असेल. त्याशिवाय मुंबई इंडियन्सकडून आकाश अंबानी, पंजाब किंग्सकडून नेस वाडिया, कोलाकात्याकडून जय महता आणि इतर संघाचे मालक, सदस्यही ऑक्शन टेबलवर दिसतील.
IPL चा आज दुबईत लिलाव, गुजरातकडे सर्वाधिक पैसा, 262 कोटींचा होणार चुराडा
IPL 2024 Auction Updates: आयपीएल लिलावापूर्वी मोठी बातमी; 'या' 3 स्टार खेळाडूंनी नावं घेतली मागे