RCB vs PBKS IPL Final 2025: मी निवडलेला संघ नेहमी हरतो, वीरेंद्र सेहवागचं विधान, तरीही म्हणाला, यंदा 'हा' संघ आयपीएल जिंकणार!
RCB vs PBKS IPL Final 2025: आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि पंजाब किंग्जचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागने भविष्यवाणी केली आहे.

RCB vs PBKS IPL Final 2025: आयपीएल 2025 चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) यांच्यात खेळला जाईल. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आतापर्यंत एकदाही आयपीएलचं जेतेपद जिंकता आलेलं नाही. त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये नवीन जेतेपद जिंकणारा संघ मिळणार आहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील अंतिम सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि पंजाब किंग्जचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागने भविष्यवाणी केली आहे.
Captain’s Photoshoot - ✅😎
— IndianPremierLeague (@IPL) June 2, 2025
Pre-match Press Conference - ✅🎙
All eyes 👀 on #TATAIPL Final tomorrow ⌛#RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets | @PunjabKingsIPL pic.twitter.com/tGdWKbZUhp
वीरेंद्र सेहवागने नेमकी काय भविष्यवाणी केली?
वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकेल. मी माझ्या जुन्या फॉर्ममध्ये परतलो आहे कारण मी पाहिले आहे की मी ज्या संघाला पाठिंबा देतो तो संघ हरतो. मुंबईविरुद्धच्या सामन्यात गुजरात असो किंवा आरसीबीविरुद्धच्या क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्ज असो. मी क्वालिफायर-2 मध्ये पंजाबविरुद्ध मुंबईला पाठिंबा दिला होता, पण मुंबईचा संघही हरला, असं वीरेंद्र सेहवागने सांगितले. त्यानंतर यंदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात कोण विजयी होणार?. असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यंदा जिंकेल, असं सेहवागने सांगितले.
विराट कोहलीसाठी आयपीएलची ट्रॉफी जिंकणार-
आरसीबीने आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकले, तर विराट कोहलीसाठी हा एक खास प्रसंग असेल. विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीची 18 वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिली आहेत, परंतु कधीही विजेतेपद जिंकले नाही. या हंगामात पहिल्यांदाच कर्णधार झालेल्या रजत पाटीदारने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही संघातील सर्व खेळाडू देशाच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीसाठी प्रतिष्ठित आयपीएल ट्रॉफी जिंकू....
पंजाब किंग्सची संभाव्य Playing XI:
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, विजयीश कुमार, अरविजकुमार, विजयकुमार सिंग
इम्पॅक्ट प्लेअर- युझवेंद्र चहल/हरप्रीत ब्रार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची संभाव्य Playing XI:
फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, जोश कुमार, हेजलवुड, सुयश शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर- लियाम लिव्हिंगस्टोन/टिम डेव्हिड





















