IPL 2025 Final Prize Money: आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघावर पैशांचा पाऊस; मुंबई-गुजरातनेही कोट्यवधी कमावले, पाहा A टू Z माहिती
IPL 2025 Final Prize Money: आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी जेतेपद पटकावणाऱ्या संघाला किती रुपये मिळणार, याची माहिती समोर आली आहे.

IPL 2025 Final Prize Money: पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) यांच्यात आज आयपीएल 2025 चा अंतिम सामना खेळवण्यात येईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार रंगेल. सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी जेतेपद पटकावणाऱ्या संघाला किती रुपये मिळणार, याची माहिती समोर आली आहे.
आयपीएल विजेत्या संघाला किती कोटी रुपये मिळतात?
आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला एक, दोन किंवा पाच नव्हे तर पूर्ण 20 कोटी रुपये मिळतील. त्याचवेळी, आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला म्हणजेच उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळतील.
पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप विजेत्यांना किती पैसे मिळतील?
आयपीएल 2025 च्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप मिळते. याशिवाय 10 लाख रुपये देखील दिले जातात. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. त्या गोलंदाजालाही 10 लाख रुपये मिळतात.
आयपीएल 2025 मधील वैयक्तिक पुरस्कार आणि रक्कम-
विजेता संघ- 20 कोटी रुपये
उपविजेता संघ- 13 कोटी रुपये
क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झालेला संघाला- 7 कोटी रुपये
एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या संघाला- 6.5 कोटी रुपये
ऑरेंज कॅप - 10 लाख रुपये
पर्पल कॅप - 10 लाख रुपये
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन - 10 लाख रुपये
सर्वात मौल्यवान खेळाडू ऑफ द सीझन - 10 लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन - 10 लाख रुपये
पॉवर प्लेअर ऑफ द सीझन - 10 लाख रुपये
हंगामात सर्वाधिक षटकार - 10 लाख रुपये
गेम चेंजर ऑफ द सीझन - 10 लाख रुपये
आयपीएल अंतिम सामन्याचे वेळापत्रक-
संघ: बंगळुरू विरुद्ध पंजाब
तारीख: 3 जून 2025
वेळ: 7.30 संध्याकाळी
नाणेफेक: 7 वाजता
स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
आयपीएलचं जेतेपद जिंकणाऱ्या संघाची यादी (2008 ते 2024 पर्यंत)
आयपीएल 2008 विजेता: राजस्थान रॉयल्स
आयपीएल 2009 विजेता: डेक्कन चार्जर्स
आयपीएल 2010 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल 2011 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल 2012 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स
आयपीएल 2013 विजेता: मुंबई इंडियन्स
आयपीएल 2014 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स
आयपीएल 2015 विजेता: मुंबई इंडियन्स
आयपीएल 2016 विजेता: सनरायझर्स हैदराबाद
आयपीएल 2017 विजेता: मुंबई इंडियन्स
आयपीएल 2018 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल 2019 विजेता: मुंबई इंडियन्स
आयपीएल 2020 विजेता: मुंबई इंडियन्स
आयपीएल 2021 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल 2022 विजेता: गुजरात टायटन्स
आयपीएल 2023 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल 2024 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स





















