RCB vs LSG IPL 2025: लखनौविरुद्ध विजय मिळवताच बंगळुरुच्या खेळाडूंचं जोरदार सेलिब्रेशन; पहिल्या क्वालिफायरमध्ये पोहताच विराट कोहलीने काय केले?, VIDEO
RCB vs LSG IPL 2025: लखनौविरुद्ध विजय मिळवल्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. या दरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

RCB vs LSG IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात (IPL 2025) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात झालेल्या बंगळुरुने 6 विकेट्सने विजय मिळवला. या शानदार विजयासह बंगळुरूने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आणि आता ते गुरुवारी पंजाबविरुद्ध खेळतील. या लढतीतील विजेता थेट अंतिम फेरी गाठेल. लखनौविरुद्ध विजय मिळवल्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. या दरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (RCB Virat Kohli Celebration)
सामना कसा राहिला?
They are pumped up & HOW 🥳@RCBTweets enter the 🔝 2️⃣ with momentum led by their charismatic skipper Jitesh Sharma 🔥
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
Scorecard ▶ https://t.co/h5KnqyuYZE #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/N0YAz0f95u
लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 227 धावा केल्या. रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद 118 धावा आणि मिशेल मार्शच्या 67 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळं लखनौनं 200 धावांचा टप्पा पार केला. ब्रीटझके यानं 14, निकोलस पूरन यानं 13 धावा केल्या. रिषभ पंतच्या शतकामुळं लखनौ सुपर जायंटसनं 3 बाद 227 धावा केल्या. मात्र,विराट कोहली, फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (Jitesh Sharma) यांच्या दमदार फलंदाजीपुढं लखनौचे गोलंदाज अपयशी ठरले. विराट कोहलीनंतर जितेश शर्मानं षटकार चौकार मारत संघाला विजयाजवळ पोहोचवलं. लखनौचे फलंदाज अपयशी ठरल्यानं रिषभ पंतचं शतक वाया गेलं. लखनौच्या गोलंदाजांची खराब कामगिरी आणि खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. आरसीबीनं 19 व्या ओव्हरमध्येच 4 बाद 230 धावा करत विजय मिळवला. आरसीबीनं त्यांच्या 18 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या यशस्वीपणे पार केली. विराट कोहली आणि जितेश शर्माची कामगिरी बंगळुरुच्या विजयात महत्त्वाची ठरली.
आयपीएलमधील प्लेऑफच्या लढती ठरल्या-
बंगळुरुच्या विजयानं प्लेऑफमधील लढती ठरल्या आहेत. क्वालिफायर 1 मधील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅच 29 मे रोजी होणार आहे. तर, एलिमिनेटरमधील लढत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. एलिमिनेटर मधील विजेता संघ क्वालिफायर 1 च्या पराभूत संघासोबत क्वालिफायर 2 चा सामना खेळेल.
The playoffs battles are set! 🤩
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
Get ready for the final frontier 🙌#TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/hW7ocjr871





















